पुरातन वस्तूंचा खजिना अनुभवा! (व्हिडिओ)

पुरातन वस्तूंचा खजिना अनुभवा!  (व्हिडिओ)

पुणे - हजारो वर्षांपूर्वीचे मानवी सांगाडे, हाडे, दगडी हत्यारे, मातीची भांडी, दागिने, खेळणी यांचा डेक्कन कॉलेजमधील  ऐतिहासिक संग्रह चकित करणारा ठरतो. मुलांनीही या माध्यमातून प्राचीन काळाची सफर करायलाच हवी. 

आदिमानवाच्या काळापासून मानवी संस्कृतीची प्रगती होत गेली. तिचा आढावा डेक्कन कॉलेजमधील संग्रहालयाच्या माध्यमातून संशोधक, अभ्यासक घेत असतात. महाराष्ट्रातील नेवासे, बोरी, मोरगाव व पाटणे, इनामगाव व मध्य भारत, पश्‍चिम भारत, कर्नाटकमधील वेगवेगळ्या ठिकाणच्या उत्खननातून सापडलेल्या वस्तूंचा येथे अभ्यास केला जातो.  

प्राचीन पुस्तकांचा अभ्यास करणाऱ्या डॉ. वृषाली भोसले म्हणाल्या, ‘‘बुद्धिबळासारख्या खेळावर लिहिलेलं जुनं पुस्तक पाहिल्यावर कळतं, की याबाबत किती सखोलपणे विवेचन करणारं लेखन केलं आहे.’’ नाणी, ताम्रपट यांच्या आधारे येथे लिपीतील बदल कसे होत गेले ते समजून घ्यायला मजा येईल. मातीच्या भांड्यांवर चित्रकला व शिल्पकला आपल्याला थक्क करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com