मुंबई-पुण्याला जोडणारी 'डेक्कन क्विन' ९३ वर्षांची; वाढदिवस दिमाखात साजरा

पुणे रेल्वे स्थानकावर केक कापून आज वाढदिवस साजरा करण्यात आला.
Deccan Queen Birthday
Deccan Queen BirthdaySakal

पुणे आणि मुंबईला जोडणारी रेल्वेगाडी डेक्कन क्विन ९३ वर्षांची झाली. तिचा वाढदिवस आज दिमाखात साजरा करण्यात आला. पुणे रेल्वे स्थानकावर यानिमित्ताने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. (Deccan Queen's 93rd Birthday Celebrated on Pune railway station)

डेक्कन क्वीन एक्स्प्रेसचा (Deccan Queen Express) ९३वा वाढदिवस साजरा झाला. प्रथेप्रमाणे रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने मोठ्या उत्साहात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. कोरोनामुळे सलग दोन वर्षे वाढदिवशी डेक्कन क्वीनचा रेक मुंबई यार्डातच होता. यावेळी इंजिनचं पूजन करत चालकाचा सत्कार देखील करण्यात आला आणि त्यानंतर ही गाडी मार्गस्थ झाली.

विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, अभिनेत्री नेहा हिंगे, रेल्वे प्रवासी संघाच्या अध्यक्षा हर्षा शहा, पुणे स्टेशनचे संचालक एस सी जैन यांच्या सह रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी व प्रवासी उपस्थित होते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com