डेक्कन क्‍वीनचा चेहरा बदलणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

पुणे - पुणे-मुंबई मार्गावरील प्रगती एक्‍स्प्रेसच्या पाठोपाठ डेक्‍कन क्वीनच्या डब्यांमध्ये सुधारणा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ‘प्रगती’च्या धर्तीवर सहा गाड्यांचे डबे बदलणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. 

प्रगती एक्‍स्प्रेसच्या डब्यांची अंतर-बाह्य रचना बदलली आहे. त्याच धर्तीवर मध्य रेल्वे प्रशासन अन्य सहा रेल्वे गाड्यांच्या डब्याची रचना बदलणार आहे. त्यामध्ये रंगरंगोटी आणि नव्या सुविधांचा समावेश केला जाणार आहे. मोबाईल चार्जर, नव्या खिडक्‍या, पडदे, कार्पेट, बैठक व्यवस्था आदींचा त्यात समावेश असेल. मुंबईमध्ये डेक्कन क्वीनचे डबे अत्याधुनिक करण्याचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. डेक्कन क्वीनच्या डब्यांमध्ये बदल करण्याऐवजी तिच्या इंजिनवर काम करून पुणे ते मुंबई दरम्यान लागणारा वेळ कमी केला पाहिजे. तसेच, ‘ट्रेन १८’चा (हाय स्पीड ट्रेन) दर्जा देऊन वेळ कमी करावा. गाडीला रंगरंगोटी करण्यापेक्षा तिची गती वाढविण्यात यावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी केली.

पुढील वर्षाच्या मार्च अखेरपर्यंत हे बदल करण्यात येणार आहेत. मात्र, या सहा गाड्या कोणत्या ते सध्या सांगता येणार नाही.
- सुनील उदासी,  जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Web Title: Deccan Queen look changed