मृत घोषित केलेला रुग्ण जिवंत 

दिलीप कुऱ्हाडे
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

येरवडा : हडपसर येथील एका मोठ्या रुग्णालयात येरवड्यातील एक रुग्ण सहा महिन्यांपासून डायलिसिसवर उपचार घेत होता. गेल्या आठवड्यात डायलिसिस करताना रुग्णाची तब्येत अचानक बिघडली. रुग्णालयाने रात्री रुग्णाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. नातेवाइकांनी सकाळी अंत्यसंस्काराची तयारी केली. मात्र घरी आल्यानंतर रुग्णाने हालचाल केल्याने तातडीने ससूनमध्ये नेण्यात आले. या रुग्णावर चार दिवसांपासून ससूनमध्ये उपचार सुरू आहेत. 

श्रीरंग माने (नाव बदलले आहे.) यांच्यावर गेले सहा महिने हडपसर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यावर डायलिसिस सुरू होते. माने यांच्या नातेवाइकांनी त्यांच्या उपचारावर सहा ते सात लाख रुपये खर्च केले. गेल्या आठवड्यात माने यांना टोचलेली सुई निघाल्याने रक्तस्राव झाला, त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली. रुग्णालय प्रशासनाने रात्री नातेवाइकांना बोलावून रुग्णाचा मृत्यू झाल्याचे घोषित करून पावणेतीन लाख रुपये बिल भरा, असे सांगितले. यावर नातेवाइकांनी रुग्णाचा अचानक मृत्यू कसा झाला, अशी विचारणा केली. यावर रुग्णालयाने त्यांची बोळवण करून "पंचवीस हजार रुपये भरा व तातडीने मृतदेह घेऊन जा' असे सांगितले. रात्रीची वेळ असल्याने नातेवाइकांनी सकाळी मृतदेह घेऊन जात असल्याचे सांगितले. 

अंत्यसंस्काराचीही तयारी 
दुसऱ्या दिवशी सकाळी नातेवाइकांनी माने यांच्या अंत्यसंस्काराची तयारी केली. काही नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णवाहिकेतून घरी आणला. दरम्यान,  नातेवाईक शोक करत असतानाच माने यांच्या हाता-पायाची हालचाल झाली. त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्‍टरांनी ते जिवंत असल्याचे सांगितले. त्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या सर्व प्रकारामुळे माने यांच्या नातेवाइकांनी हडपसर येथील रुग्णालयाच्या हलगर्जीपणाबद्दल संताप व्यक्त केला आहे. 
 
Web Title: The deceased patient is alive