डिसेंन्ट फाऊंडेशनचा "कळी उमलताना" हा नवीन उपक्रम

दत्ता म्हसकर
मंगळवार, 20 मार्च 2018

जुन्नर (पुणे) : डिसेंन्ट फाऊंडेशन पुणे यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींसाठी "कळी उमलताना" या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा प्रारंभ आज शनिवारी (ता.20) जुन्नर येथील कृषणराव मुंढे विद्यालय येथे झाला. 

या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना वैयक्तिक स्वच्छतेबाबत, मुलींमध्ये वाढत्या वयात होणाऱ्या नैसर्गिक बदलाबाबत, त्यांच्यातील संभ्रमाबाबत तसेच सॅनेटरी नॅपकिनच्या वापराबाबत जाणीव जागृती करण्यासाठी या कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले असून ज्या गावात हा कार्यक्रम असेल तेथे सॅनिटरी नॅपकिनचे व रेड डाॅट डिस्पोजेबल बॅगचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.  

या उपक्रमासाठी तालुक्यातील प्रत्येक विभागातून काही महीला डॉक्टर किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करणार असल्याचे डिसेंन्ट फाऊंडेशन चे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी सांगितले. यावेळी डॉक्टर श्रध्दा भिडे, डॉक्टर कल्याणी पुंडे व डॉक्टर सविता फलके  यांनी मुलींना मार्गदर्शन केले. यावेळी २५० विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते सॅनेटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. 

यावेळी डिसेंन्ट फाऊंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, विद्यालयाचे मुख्याध्यापक पोटकुले,  पल्लवी डोके , छाया बिडवई, रविंद्र पाटे, प्रकाश चौधरी, बाळासाहेब काळे, पी. बी. जाधव, भारती शेजवळ, समन्वयक जितेंद्र लोखंडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अर्चना खोसे यांनी केले. वर्षा चौधरी यांनी आभार मानले. 

Web Title: decent foundation organised kali umalatan program