भूगोलाच्या पेपरवर १५ एप्रिल नंतर निर्णय

Decision after April 15 on geography paper of 10th exam
Decision after April 15 on geography paper of 10th exam

पुणे : इयत्ता १०वीचा शेवटचा भूगोलाचा पेपर 'कोरोना'मुळे रद्द करण्यात आला होता, त्याचे पुढील वेळापत्रक आता १५ एप्रिल नंतरच जाहीर केले जाणार आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्रात 'कोरोना'चा प्रभाव वाढत असताना इयत्ता १२ वी व १० वीची परीक्षा सुरू होती. १२वीची परीक्षा १८ मार्च रोजी संपली. दरम्यान १०वीचा १९ मार्चला व्यवसायिक विषये व २१ मार्चला इतिहासाचा पेपर राज्यभर घेण्यात आला. २३ मार्चला शेवटचा भूगोलाचा पेपर होणार होता, पण राज्यातील रुग्णांची संख्या वाढत असताना, परीक्षेच्या निमित्ताने विद्यार्थी एकाच ठिकाणी जमत असल्याने त्यांना लागण होण्याची भीती होती. त्यामुळे २३ मार्च रोजी होणारी परीक्षा रद्द करत पुढील वेळापत्रक जाहीर केले जाईल असे  सांगण्यात आले. त्यानंतर देशात १४ एप्रिल पर्यंत लाॅकडाऊन जाहीर करण्यात आल्याने शेवटचा एकच पेपर अडकला असल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. 

याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे म्हणाल्या, "देशात १४ एप्रिल पर्यंत लाॅकडाऊन असल्याने, १०वीचा भूगोलाचा पेपर कधी होणार याचा निर्णय १५ एप्रिल नंतरच जाहीर केला जाईल."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com