काय सांगता? पुण्यात भाडेकरू होणार घरमालक

महापालिका मालकीच्या सदनिकांची विक्री करण्याचा निर्णय
rent house.jpg
rent house.jpg

पुणे: महापालिकेच्या मालकीच्या इमारतीमध्ये भाडेतत्वावर देण्यात आलेल्या सदनिका संबंधित भाडेकरूंना शुल्क आकरून मालकी हक्काने करून देण्याचा निर्णय शहर सुधारणा समितीच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात १५१२ सदनिकांची विक्री करण्याचे प्रस्तावित करण्यात आले. बारा ते पंधरा लाख रुपयांमध्ये या सदनिका उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती समितीचे अध्यक्ष आनंद रिठे यांनी दिली.(Decision to sell PMC owned flats to the tenant)

शहरातील विविध भागांत रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन महापालिकेच्या वतीने मालकीच्या इमारतीमध्ये करण्यात येते. प्रति महिना ४५० रुपये मिळकतीचे भाडे महापालिका आकारते. या मिळकती संबंधित भाडेकरुंच्या नावावर करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने समिती समोर ठेवण्यात आला होता. त्यास मंजुरी देण्यात आली.

rent house.jpg
छत्रपती शिवाजी महाराजांची जर्मनी, पॅरिस आणि अमेरिकेतील समकालीन चित्रे

महापालिकेच्या मुख्य खात्यासह औंध, कोथरूड, वारजे कर्वेनगर, ढोले पाटील रोड आणि हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत या सदनिका भाडेतत्वावर देण्यात आल्या आहेत. यातील १०८१ सदनिका मुख्य खाते तर ४३१ सदनिका क्षेत्रीय कार्यालयांच्या आहेत.

महापालिकेने १९९१-९२ पासून अशा पद्धतीने भाडेतत्वावर सदनिका दिल्या आहेत. ज्या भागात या सदनिका आहेत, तेथील रेडिरेकनरचा दर लक्षात घेऊन विक्री केली जाणार आहे. सर्वसाधारण १२ ते १५ लाख रूपयांमध्ये या सदनिका उपलब्ध होणार आहेत. २७० चौरस फूट आकाराच्या या सदनिका आहेत. या निर्णयामुळे भाडेकरु आता मालक होणार असून, सर्वसामान्यांना दिलासा मिळणार असल्याचे रिठे यांनी सांगितले.

''पालिकेने भाडेतत्वावर दिलेल्या सदनिकांची विक्री होणार असल्याने पालिकेला महसूल मिळणार आहे. या सदनिकांच्या देखभाल दुरुस्तीसाठी दरवर्षी होणारा पालिकेचा खर्च वाचणार आहे. तसेच या विकण्यात आलेल्या मिळकतीचा मिळकतकर जमा होणार असल्याने उत्पन्नाचा स्रोत वाढणार आहे.''

- आनंद रिठे, अध्यक्ष, शहर सुधारणा समिती, पुणे महापालिका

rent house.jpg
पुणे शहरात 187 तर जिल्ह्यात 826 नवे रुग्ण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com