पुणे-मुंबई हायपरलूपसाठी मागवल्या हरकती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 जानेवारी 2019

पुणे - पुणे आणि मुंबई या दोन महानगरांना जोडणाऱ्या हायपरलूप प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हरकती मागविल्या आहेत. हायपरलूप प्रकल्पामुळे थेट बाधित होणाऱ्या कोणत्याही व्यक्‍तीला ३० दिवसांच्या आत प्राधिकरणाकडे हरकती सादर करता येतील.

पुणे-मुंबई हायपरलूप प्रकल्पासाठी ‘व्हर्जिन हायपरलूप वन’ या अमेरिकन कंपनीसोबत करार केला आहे. प्राधिकरणाने या प्रकल्पाला पायाभूत सुविधा प्रकल्प घोषित केला आहे. त्याची अंमलबजावणी ‘स्विस चॅलेंज पद्धती’ तत्त्वावर करण्यात येत आहे. या प्रकल्पाचा खर्च खासगी गुंतवणकीतून करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १४ किलामीटर डेमो ट्रॅकची निर्मिती करण्यात  येणार आहे. 

हा हायपरलूप प्रकल्प उच्च तंत्रज्ञानावर आधारित असून, देशातील पहिला नावीन्यपूर्ण प्रकल्प आहे. यामुळे पुणे-मुंबई दरम्यानचे अंतर केवळ ३० मिनिटांत पार करण्याचे उद्दिष्ट असून, नागरिकांना सुरक्षित आणि अतिवेगवान प्रवासाचा अनुभव घेता येईल. या प्रकल्पाबाबत कोणाच्या हरकती असल्यास त्यांनी १८ फेब्रुवारीपर्यंत हरकती सादर कराव्यात, असे आवाहन ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्‍त किरण गित्ते यांनी केले आहे.

Web Title: Declaration requested for Pune-Mumbai Hyperloop