भारतातून होणाऱ्या तांदळाच्या निर्यातीत घट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जुलै 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि भारताच्या तुलनेत अन्य देशांतून बिगर बासमती तांदळाची निर्यात जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे भारतातून आंबेमोहोर, मसुरी, सोनामसुरी, बॉईल्ड राइस, इंद्रायणी यांसह सर्व प्रकारच्या बिगर बासमती तांदळाची निर्यात ३३ टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. २०१९-२० मध्ये भारतातून ५०.३५ लाख टन इतकी निर्यात झाली. त्यामुळे फक्त १४३५० कोटींची उलाढाल झाली आहे.

मार्केट यार्ड - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि भारताच्या तुलनेत अन्य देशांतून बिगर बासमती तांदळाची निर्यात जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे भारतातून आंबेमोहोर, मसुरी, सोनामसुरी, बॉईल्ड राइस, इंद्रायणी यांसह सर्व प्रकारच्या बिगर बासमती तांदळाची निर्यात ३३ टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. २०१९-२० मध्ये भारतातून ५०.३५ लाख टन इतकी निर्यात झाली. त्यामुळे फक्त १४३५० कोटींची उलाढाल झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image may contain: text that says "यंदा कोरोनाच्या पारश्वभूमीवर व्यापाऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. निर्यात वाढवण्यासाठी सरकारने यात तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे. राजेश शहा, तांदळाचे व्यापारी, मार्केट यार्ड वर्ष निर्यात टनामध्ये उलाढाल २०१७ -१८ २०१८-१९ ८६. ३५ लाख २०१९-२० ७५. ३५ लाख ५०. ३५ लाख २२९३० कोटी रुपये २०९०० कोटी रुपये १४३५० कोटी रुपये"

मागील वर्षी भारतातील बिगर बासमती तांदळाचे दर इतर देशांच्या तुलनेत खूप जास्त होते. तसेच जागतिक निर्यातीच्या स्पर्धेत चीन, इंडोनेशिया, मलेशियासारख्या देशांनी भारतापेक्षा कमी दरात बिगर बासमतीची निर्यात केल्यामुळे यंदा निर्यातीत घट झाली आहे. याबाबत सरकारने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत मार्केट यार्डातील तांदळाच्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.

कोरोनाबाधित डाॅक्टरांना समाजाकडून मिळालेल्या वेदना डोळ्यात पाणी आणतील...

भारतातून आंबेमोहोर, कालीमुछ, इंद्रायणी हे जे केवळ भारतात पिकवले जातात. त्यामुळे याच तांदळाची निर्यात होईल, तसेच डॅश, मसुरी, आयआर-६४ इत्यादी तांदूळ जगातील इतर देश भारतापेक्षा कमी दराने निर्यात करतात म्हणून भारतातील बिगर बासमती तांदळाची निर्यात घटत चालली असल्याचेही व्यापाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decline in rice exports from India