मार्केट यार्डातील फुलबाजारात 'एवढी' आवक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जून 2020

फुल बाजारात सुरू झाल्यानंतरचा अद्याप फुलांची आवक वाढलेली नाही. बाजारात नेहमीच्या तुलनेत केवळ 5 ते 6 टक्केच आवक होत आहे.

मार्केट यार्ड (पुणे) : फुल बाजारात सुरू झाल्यानंतरचा अद्याप फुलांची आवक वाढलेली नाही. बाजारात नेहमीच्या तुलनेत केवळ 5 ते 6 टक्केच आवक होत आहे. मंदिर, कार्यालये सुरू नसल्याने फुलांना अपेक्षित मागणीही नाही.

- लॉकडाऊन शिथील होताच आत्महत्यांच्या घटना वाढल्या; काय आहेत याची कारणे?

रविवारी बाजारात 10 टन फुलांची आवक झाल्याची माहिती विभागप्रमुख प्रदीप काळे यांनी दिली. बाहेर गावाहून फुलांना मागणी आहे. मात्र, पुरेशी वाहतुकीची सुविधा उपलब्ध नसून, येत्या काही दिवसात आवक-जावक सुरळीत होईल, असे फुलांचे व्यापारी अरुण वीर यांनी सांगितले.

- 'अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय...'; सरकारच्या निर्णयाबाबत विद्यार्थ्यांचं म्हणणं काय?
 

फुलांचे प्रतिकिलोचे भाव पुढीलप्रमाणे : झेंडू : 40-80, गुलछडी : 2-5, कापरी : 40-50, शेवंती : 30-60, ऍस्टर : 20-30, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : 15-25, गुलछडी काडी : 20-40, डच गुलाब (20 नग) : 50-100, लिलि बंडल : 0.50-1, जर्बेरा : 5-15, मोगरा : 100-150


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decreased flow of flowers in the market yard