मानकरांना पोलिसांसमोर हजर होण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक दीपक मानकर यांचा जामीन फेटाळत दहा दिवसांत पोलिसांसमोर हजर होण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने अटक टाळण्याचे त्यांचे सारे प्रयत्न फोल ठरले आहेत. 

मानकर यांच्या संबंधातील एका व्यक्तीने दोन जून रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणात मानकर यांच्यासह इतर चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. मात्र, अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करीत असलेल्या मानकर यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पुणे जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

उच्च न्यायालयानेही जामीन फेटाळल्याने मानकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या निर्णयामुळे मानकर यांना आता पोलिसांसमोर हजर व्हावे लागणार आहे. 

मानकर हे पुणे महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक असल्याने तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदासाठी त्यांचे नाव गेले तीन महिने आघाडीवर आहे. शहराध्यक्षपदी त्यांची निवड करण्याचे निश्‍चित झाले होते. मात्र, या घटनेमुळे त्यांचे नाव मागे पडले. त्यानंतर पक्षाने नव्या शहराध्यक्षाच्या निवडीची प्रक्रियादेखील थांबवली आहे. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर मानकर यांच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला विशेष महत्त्व आहे.

Web Title: deepak mankar crime police supreme court