दीपक मानकर यांच्यासह सात जणांच्या कोठडीत वाढ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

पुणे - सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्यासह सात जणांना संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत (मोका) पोलिस कोठडी सुनावण्यात आली. विशेष न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

याप्रकरणी विनोद रमेश भोळे (वय ३४, रा. घोरपडी पेठ), सुधीर दत्तात्रय सुतार (वय ३०, रा. जय भवानीनगर, कोथरूड), अमित उत्तम तनपुरे (वय २८, मांडवी खुर्द, हवेली), अतुल शांताराम पवार (वय ३६, रा. शांतीनगर, येरवडा), विशांत श्रीरंग कांबळे (वय ३०, रा. येरवडा), नाना बाळू कुदळे (वय ४०, रा. हनुमाननगर), अजय चंद्रकांत कंदारे (वय २७, घनवट पाटील, एरंडवणा) अशी ‘मोका’अंतर्गत कोठडी झालेल्या सात जणांची नावे आहेत. कर्नाटकी यांना यापूर्वी उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मानकर यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झालेली आहे. सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी पोलिस कोठडी देण्याची मागणी केली.

Web Title: Deepak mankar with seven people police custody crime