दीपालीची डबडबलेल्या डोळ्यांनी मदतीची अपेक्षा...

फोटो ओळ मुंबईः सायन येथील लोकमान्य टिळक रूग्णालयात उपचार घेत असलेली निगाव दुडे (ता. शिरूर) येथील चित्राली पानगे.
फोटो ओळ मुंबईः सायन येथील लोकमान्य टिळक रूग्णालयात उपचार घेत असलेली निगाव दुडे (ता. शिरूर) येथील चित्राली पानगे.

टाकळी हाजी (ता. शिरूर, पुणे): सर..येथे कोणीच लक्ष देत नाही. दवाखान्यातील अधिकारी व कर्मचारी पोलिसांचे म्हणने ऐकून घेत नाहीत. पैसे भरा लगेच शस्त्रक्रिया करतो असे म्हणतात. मी कोठून पेसे आणणार. यापेक्षा गावाला जाऊन आपन उपचार घेऊ. काही करा सर मला येथून घेऊन चला. डबडबलेल्या डोळ्यांनी मदतीची अपेक्षा करत पोलिस भरतीनंतर अपघात झालेल्या दीपाली काळे हिची प्रतिक्रिया येत होती.

मुंबई, सायन येथील लोकमान्य टिळक रूग्णालयात अपघातानंतर तिच्यावर उपचार सुरू आहेत. 'सकाळ' प्रतिनिधीने थेट दीपालीची भेट घेतल्यानंतर तीने उपचाराबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मुंबई येथे महाराष्ट्र पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू असून त्याअंतर्गत मुंबईत धावण्याची चाचणी पुर्व द्रुतगती मार्गावर सर्व्हिस रोडवर घेतली गेली. याच ठिकाणी मंगळवार (ता. 8 ) अकराच्या दरम्यान पोलिस भरती प्रक्रिया झाल्यावर विक्रोळी स्थानकाकडे जाताना शिरूर येथील शितोळे अॅकेडमीतील चार तरूणींना चार चाकी वाहनाने उडविले. यामध्ये काजल कर्डे, दीपाली काळे, चित्राली पानगे आणी चैत्राली दोरगे या तरूणी जखमी झाल्या. त्यामध्ये काळे हिला जास्त दुखापत असल्याने तिला सायनच्या टिळक रूग्णालयातील अतीदक्षता विभागात हलविण्यात आले होते. चिंचोली मोराची ( ता. शिरूर ) येथील ग्रामस्थ अशोक उर्किडे यांना घटनेची माहिती मिळताच काळे कुटूंबियांना धिर देत त्यांच्या निवास व जेवनाचा खर्च उचलला. आहे. खेड्यातून आलेल्या या गरीब कुटूंबाला मात्र शासकीय रूग्णसेवा मिळत नसल्याचे चित्र आहे. दीपालीला डोक्याला मार लागल्याने तिचे सिटीस्कॅन व हातावर शस्त्रक्रिया होणे गरजेचे होते. पंरतू ती शस्त्रक्रिया करण्यासाठी शाररीक फिटनेस नसल्याचे प्रथम वैद्यकिय अधिकारी सांगत होते. त्यामुळे तिच्या हातावर शस्त्रक्रिया झाली नाही. सध्या ती याबाबत फिट असल्याने हातावर शस्त्रक्रिया होणे गरजेचे आहे. याबाबत येथील वैद्यकिय अधिकारी पैसे भरा मगच शस्त्रक्रिया करू अशी भुमीका घेतल्याने दीपाली समोर आर्थीक समस्या उभी राहिली आहे.

दीपालीला मदत करण्याचे आवाहन सामाजीक संस्थांना करण्यात आले आहे. या अपघातात निमगाव दुडे (ता. शिरूर) येथील चित्राली पानगे हिच्या हाताला मार लागला आहे. तिच्या हातावर शस्त्रक्रिया होणे गरजेचे आहे. शस्त्रक्रिया करण्यासाठी वैद्यकिय अधिकारी दररोज या मुलीला उपाशी ठेवत आहे. सायंकाळी उशीरा वैद्यकिय अधिकारी आला नसल्याचे कारण पुढे करून ही शस्त्रक्रिया देखील टाळाटाळ केली जात असल्याचे तिचे वडील संतोष पानगे यांनी सांगितले.

मदतीसाठीः
दरम्यान दीपाली प्रदिप काळे हिला आर्थीक मदतीची गरज असून तिला मदतीसाठी बॅक ऑफ महाराष्ट्र या खाते क्रमांक 60138135978 आहे. यासाठी आयएफसी क्रमांक MAHB0001715 देण्यात आला आहे. शितोळे अॅकेडमी मधील माजी विद्यार्थ्यांनी यासाठी भरभरून मदत करण्याचे आवाहन शिरूरचे प्रशिक्षक संजय शितोळे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com