पिंपळवंडीच्या यशवंत पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार

junnar.
junnar.

जुन्नर - पिंपळवंडी (ता.जुन्नर) येथील यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेला राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. महाराष्ट्र  राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने पुणे विभागातील पन्नास ते शंभर कोटींच्या ठेवी असणाऱ्या पतसंस्थांच्या गटातील प्रथम क्रमांकाचा दीपस्तंभ पुरस्कार नुकताच लोणावळा येथे विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला अशी माहिती  संस्थापक अध्यक्ष महादेव वाघ यांनी दिली. 

हा पुरस्कार अध्यक्ष वाघ, उपाध्यक्ष फकीरभाई इनामदार, संचालक भिमाजी कोकाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी रंजना मंडलिक, सल्लागार लक्ष्मण मंडलिक यांनी स्वीकारला यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे उपस्थित होते. पातसंस्थेने सतत तेहतीस वर्षे शंभर टक्के कर्जवसुलीचे ध्येय करताना, गावातील धार्मिक सामाजिक शैक्षणिक उपक्रमात सहभाग घेतला आहे. संस्थेचा पारदर्शी कारभार संचालक मंडळाची साथ, पतसंस्थेच्या सर्व सभासदांचे सहकार्य यामुळेच हा पुरस्कार प्राप्त झाला असल्याचे अध्यक्ष वाघ यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com