कात्रज प्राणी संग्रहालयातील हरिण अन् सांभर गायब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांभर खंदकाच्या सुरक्षा भिंतीचे भगदाड पत्रा लावून बुजविण्यात आले आहे.

दोन वर्षभरापूर्वी कुत्र्यांच्या हल्ल्यात काळवीट मृत्यूमूखी पडल्याची घटना घडली होती. प्राणी संग्रहालयात यापूर्वी मोर, लांडोर, घुबड व चंदन चोरीच्या घटना वारंवार घडल्या आहेत.

कात्रज प्राणी संग्रहालयातील हरिण अन् सांभर गायब

कात्रज - रविवारी सायंकाळी झालेल्या जोराच्या पावसाने राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील सांभर खंदकाची सुरक्षा भिंत खचली. या भिंतीला मोठे भगदाड पडले. त्यातून दोन हरीण व एक सांभर बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचे हे उदाहरण असून अशा घटना वारंवार घडत आहेत.

दोन वर्षभरापूर्वी कुत्र्यांच्या हल्ल्यात काळवीट मृत्यूमूखी पडल्याची घटना घडली होती. प्राणी संग्रहालयात यापूर्वी मोर, लांडोर, घुबड व चंदन चोरीच्या घटना वारंवार घडल्या आहेत. अशा घटनांमुळे प्राणी संग्रहालयातील प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र यापूर्वीच्या घटनेपासून कोणताही बोध प्रशासनाने न घेता दुर्लक्ष केल्याने रविवारची घटना घडली असल्याचे मत वन्यजीव प्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे.

संग्रहालयातील सांभर खंदकात ३२ हरीण व २८ सांभर होते. त्या खंदकास मोठे भगदाड पडले असून ६० प्राण्यांपैकी दोन हरीण व एक सांभर बेपत्ता असल्याचे संग्रहालय व्यवस्थापनाच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी शोधमोहीम सुरू केली. मात्र सोमवारी संध्याकाळपर्यंत तपास लागला नाही. या घटनेची माहिती वन्यजीव प्रेमींना मिळल्यानंतर त्यांनी संग्रहालय अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे विचारपूस केली. मात्र असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगत सर्व प्राणी आहेत असे सांगितले. माजी नगरसेवक युवराज बेलदरे यांनी यासंदर्भात दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दोन चितळ गायब झाले आहेत. ते प्राणी संग्रहालयातच असून ते कर्मचाऱ्यांच्या नजरेस आले आहेत. त्याचे फोटोही आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी मागे लागल्यास ते घाबरून दुसरीकडेच जाऊन बसतील. त्यामुळे त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांचा शोध घेणे चालू आहे.

- अशोक घोरपडे, मुख्य उद्यान अधीक्षक

संग्रहालयातील वन्यजीव कोठेही गेलेले नाहीत. ते प्राणी संग्रहालयातच आहेत. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. खंदकाची भिंत जुनी असल्याने ती पडली होती. त्याठिकाणी पत्रे लावून ती व्यवस्थित करण्यात आली आहे.

- विलास कानडे, अतिरिक्त आयुक्त

Web Title: Deer And Sambar Animals Missing From Katraj Zoological Museum Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..