अरे रे...अन्नपाण्याच्या शोधात आलेल्या भेकराची शिकार

velhe
velhe

वेल्हे (पुणे) : वेल्हे तालुक्यातील कर्नवडी येथे भात शेतामध्ये आलेल्या भेकर या वन्यप्राण्याची शिकार केल्याप्रकरणी राजू बाळू पवार (वय ४५, रा. कर्नवडी) यास भोर व वेल्हे  वनविभागाने अटक केली असून, या आरोपीस सात दिवसांची फॉरेस्ट कोठडी मिळाली असल्याची माहिती वेल्ह्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी आय. जी. मुलाणी यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी राजू पवार याने रविवारी (ता. ९) रात्रीच्यावेळी अन्नपाण्याच्या शोधात शेतात आलेल्या भेकराची शिकार केली असल्याची माहिती वनविभागास अज्ञात व्यक्तींकडून मिळाली. त्यानंतर त्याच रात्री वनविभागाकडून आरोपीच्या घरावर छापा टाकला. त्यात मुद्देमालासह शिकारीमध्ये वापरण्यात आलेली बंदुक, कोयता जप्त केला आहे, तर आरोपीस अटक करुन भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत कलम ९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. काल त्यास न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची (१७ ऑगस्टपर्यंत) फॉरेस्ट कोठडी मिळाली आहे. याबाबतची अधिक चौकशी भोर वनविभागाच्या उपविभागीय अधिकारी आशा भोंग यांच्या मार्गदर्शनाखाली वेल्ह्याचे वनपरिक्षेत्र अधिकरी आय. जी. मुलाणी, वनपाल मनोज तारु, पी. एस. खोमणे, एस. एस. सकपाळ, एस. डी. भोकरे हे करत आहेत.

वेल्हे तालुका निसर्गसंपन्न व सह्याद्रीच्या डोंगररांगाने वेढला आहे. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात घनदाट जंगल असून, अनेक वन्यजिवांचे वास्तव्य या भागामध्ये आहे. तालुक्यामध्ये किल्ले राजगड परिसर, किल्ले तोरणा परिसर, अठरागाव केळद परिसर, रायगड जिल्ह्याच्या सीमांवर मोठ्या प्रमाणात शिकारी होत असतात, परंतु याची वाच्यता होत नसल्याने बहुतांशी प्रकरणे उघडकीस येत नाहीत. याकरीता वनविभागाने या गोष्टीकडे बारकाईने लक्ष घालणे महत्वाचे आहे, असे मत निसर्गप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com