विहिरीत पडलेल्या हरणाला शेतकऱ्याकडून जीवदान

pune
pune

केडगाव जि.पुणे : केडगाव (ता.दौंड ) शिवारात विहिरीत पडलेल्या हरणाच्या पिलाला तेथील शेतकरी भरत काळभोर यांनी जीवदान दिले. 

चारा व पाण्याच्या शोधात हे हरीण काळभोर यांच्या शेतात आले होते. हरीण विहीरीत पडल्याचे काळभोर यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी प्रथम वन कर्मचा-यांना कळविले. वन कर्मचा-यांनी हरणाला त्वरीत पाण्यातून बाहेर काढण्यास सांगितले. काही वेळातच वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तपासणी केली असता. हरीण कुठेही जखमी झाले नव्हते. त्यामुळे वनकर्मचारी बाबासाहेब कोकरे व अरूण मदने यांनी  हरीणला पुन्हा वन विभागात सोडुन दिले. हे हरीण सुमारे सहा महिन्यांचे वयाचे होते. केडगावच्या नैऋत्य भागात माळरान जमिनी व त्या लगत वन जमीन आहे. या परिसरात भरत काळभोर यांची शेती आहे त्या परिसरात हरणांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. काळभोर यांच्या शेतात सिंचन चालू असताना तेथे पाणी पिण्यासाठी हरणे येत असतात.  या भागात पडीक जमीन व माळरान मोठ्या प्रमाणात असल्याने तेथे हरणांची संख्या जास्त आहे. या भागात चारा आणि पाण्याची समस्या असल्याने हरणे लोकवस्तीत येऊ लागली आहेत. वनविभागाने या भागात पाण्याची सोय करावी अशी मागणी होत आहे. हरणे सतत पाणी पिण्यासाठी या भागात येत असल्याने काळभोर यांनी पिण्याच्या पाण्यासाठी त्यांच्या शेतात हौद बांधले आहेत.

वनकर्मचारी बाबासाहेब कोकरे, म्हणाले की, हरीण जखमी नसल्याने त्यास पुन्हा वनविभागात सोडण्यात आले आहे वनविभागात प्राण्यांसाठी पाण्याची सोय केलेली आहे. मात्र पाऊस नसल्याने हिरव्या चा-यांची टंचाई आहे. त्यामुळे हिरव्या चा-यासाठी हे प्राणी शेताच्या दिशेने येत आहेत. सापडलेले हरीण हे चिंकारा जातीचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com