खड्ड्यात पडलेल्या हरणाला मिळाले जीवदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

वारजे माळवाडी - वारजे माळवाडीतील डुक्कर खिंडीजवळील डोंगरालगत असलेल्या एका खड्ड्यात रविवारी रात्री हरीण पडले होते. स्थानिक नागरिक, प्राणी मित्र, वन विभाग व अग्निशामक दलाच्या सयूंक्त मोहिमेमुळे या हरणास जीवदान मिळाले. 

वारजे माळवाडी - वारजे माळवाडीतील डुक्कर खिंडीजवळील डोंगरालगत असलेल्या एका खड्ड्यात रविवारी रात्री हरीण पडले होते. स्थानिक नागरिक, प्राणी मित्र, वन विभाग व अग्निशामक दलाच्या सयूंक्त मोहिमेमुळे या हरणास जीवदान मिळाले. 

वारजेतील डुक्करखिंड रस्त्यालगत असणाऱ्या डोंगराळ भागात रविवार रात्री आठ वाजता एक हरिण खोल खड्ड्यामधे पडले. हा खड्डा किमान वीस ते पंचवीस फुट खाली पडले. खड्डयातमध्ये मोठी दगडे, पालापाचोळा, गवत व पाणी असल्याने त्या हरिणास बाहेर पडता येत नव्हते. हे स्थानिक नागरिकांनी पाहिले व त्यांनी प्राणी मित्र प्रतिक महामूनी यांना ही माहिती दिली. त्यानुसार महामूनी व वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोचले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन अग्निशमन दलास याबाबत माहिती दिली. 

सिहंगड अग्निशमन केंद्राची गाडी चालक भरत भुजबळ तसेच तांडेल रोहिदास दुधाणे व जवान संतोष भिलारे, सुनिल दिवाडकर, भरत गोगावले, भारत पवार हे घटनास्थळी पोचले. त्यावेळी, हरिण खड्ड्यातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करीत होते. हे लोक जमल्यामुळे त्याची तेवढ्याच भागात धावाधाव सुरु होती. जवानांनी दोरी जाळीच्या साह्याने त्याला खड्डयातवर घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, हरिण  भेदरलेल्या स्थितीत असल्याने त्याला जाळीमध्ये घेणे अवघड जात होते. पण शेवटी सुमारे अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर त्याला जाळीमध्ये घेण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. त्याला बाहेर काढल्यानंतर त्याला वरचेवर पाहिले असता. किरकोळ जखमा झाल्याचे दिसले. त्याचवेळी जवानांनी तातडीने कात्रज प्राणी संग्राहलयाशी संपर्क साधला. त्या हरणाला अग्निशमन वाहनातून नेऊन प्राणी संग्राहलयाच्या ताब्यात दिले. तिथे उपस्थित असणाऱ्या डॉक्टरांना घटनेची माहिती दिली. मुक्या प्राण्याचा जीव वाचविल्याचा आनंद मानला.

Web Title: deer rescued in warje malwadi