डिजिटल तंत्रज्ञानातून मेघडंबरी

सम्राट कदम
शुक्रवार, 15 मार्च 2019

पुणे - मेघडंबरी छत्र असलेले महापुरुषांचे पुतळे नेहमीच आकर्षणाचा विषय ठरतात. नुकतेच अनावरण करण्यात आलेला महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा दिव्यांनी सुशोभित असणारा पुतळाही पुणेकरांचे आकर्षण ठरत आहे. महर्षी कर्वे स्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर फॉर वुमेनच्या (बीएनसीए) शिक्षक व विद्यार्थिनींनी आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मेघडंबरी साकारली आहे.

शुभ्र दिव्यांच्या प्रकाशात ही मेघडंबरी हिऱ्यासारखी चमकताना दिसते. महानगरपालिकेने एखाद्या शिक्षण संस्थेच्या समन्वयातून उभारलेला हा पहिलाच पुतळा आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्‍यप म्हणाले, ‘‘संपूर्ण भारतीय उपखंडात डिजिटल आर्किटेक्‍चर शिकवणारे व त्यासाठी लागणारे थ्रीडी प्रिंटिंग मशिन, रोबोटीक आर्म अशा अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करणारे आमचे एकमेव महाविद्यालय आहे.’’ महर्षी कर्वे पुतळ्याच्या मेघडंबरीसाठी लागणारे डिजिटल आर्किटेक्‍चरचे तंत्रज्ञान, संशोधने, फॅब्रिकेशन महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत करण्यात आले. 

प्रा. धनश्री सरदेशपांडे यांच्या सहकार्यातून हे काम प्रा. स्वप्नील गवांदे यांनी साकारले आहे. यासाठी प्रा. गवांदे याचा सत्कार महापौर मुक्ता टिळक यांनी केला. या कामात वास्तुरचनाकार आनंद खैरनार तसेच विद्यार्थिनी खुशबू अग्रवाल, स्नेहा येरुनकर, विनीता वाघ, सानिया भामरा, मुग्धा गांधी, नेत्रा मेदनकर, राधा मल्लावत तसेच राजेश पवार यांचे सहकार्य लाभले.

मेघडंबरीची वैशिष्ट्ये
मेघडंबरीसह पुतळ्याची उंची २७ फूट
गणितीय व संगणकीय प्रोग्रामींगच्या वापराद्वारे कल्पवृक्षासारख्या रचनेची निर्मिती
भौमितिक ९०० त्रिकोण व १५० षटकोनांचा वापर
संपूर्ण कामात ३,६०० जोड 
लेझर किरणांच्या वापरातून लोखंड कापण्याचे काम
तीन मितीमध्ये विस्तार असणाऱ्या १७ फुटी उंचीच्या कल्पवृक्षावर १५० एलईडी दिव्यांची रोषणाई

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Degital Technology Meghdambari