वाहन प्रवेशकराचा देहूत ठराव मंजूर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

देहू - देहू गावाच्या हद्दीत देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना वाहनांच्या पार्किंगसाठी दर आकारण्यात येत होता.

मात्र, पार्किंगसाठी जागा नसल्याने पार्किंगऐवजी वाहन प्रवेशकर आकारण्यात येणार आहे. याबाबतचा ठराव मंगळवारी (ता. २७) झालेल्या ग्रामपंचायतच्या मासिक सभेत मंजूर करण्यात आला. तसेच रस्त्याच्या कडेला पूजा साहित्य विक्री करणाऱ्या दुकानदारांना २० रुपये स्वच्छता कर आणि इतर दुकानदारांना ४० रुपये स्वच्छता कर महिन्याला आकारण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसुरकर यांनी दिली.

मासिक सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच उषा चव्हाण होत्या. उपसरपंच संतोष हगवणे, सदस्य दिनेश बोडके, अभिजित काळोखे, स्वप्नील काळोखे, सचिन विधाटे, सचिन कुंभार, नीलेश घनवट, रत्नमाला करंडे, ज्योती टिळेकर, हेमा मोरे, राणी मुसडगे, उपस्थित होते.

देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पार्किंगसाठी वाहनाला ३० रुपये दर आकारण्यात येत होता. वसुलीसाठी एका खासगी ठेकेदाराची नेमणूक केली होती. ग्रामपंचायतीला यातून वर्षाला चार लाख रुपये उत्पन्न मिळत होते. मात्र आज झालेल्या मासिक सभेत पार्किंगऐवजी वाहनकर आकारण्याचा निर्णय झाला.

याबाबत गुडसुरकर यांनी सांगितले, की देहूत पार्किंगसाठी जागा नाही. तसेच पार्किंगचा दर आकारला तर त्याला सुविधा देता येत नव्हती. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षापासून वाहन प्रवेशकर आकारण्याचा विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आला. पंचक्रोशीतील वाहनचालकांकडून वाहन प्रवेशकर आकारण्यात येणार नाही. मात्र बाहेरगावाहून येथे आलेल्या नागरिकांना वाहनकर आकारण्यात येणार आहे. वाहनकर वसुलीसाठी ठेकेदार नेमणार आहे. दरम्यान, सहा महिन्यांची मुदत संपल्याने उपसरपंच संतोष हगवणे यांनी पदाचा राजीनामा मासिक सभेत दिला.

Web Title: dehu pune news vehicle entry fee