देहूतील पुलाचे नववर्षात उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

देहू - पुणे मुंबई महामार्गावर देहूरोड शहरात बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाचे काम ९५ टक्के झाले आहे. पथदिवे, रस्ता दुभाजक टाकणे आणि डांबरीकरण झाले आहे. नवीन वर्षात या पुलाच्या उद्‌घाटनाची प्रतीक्षा देहूरोडकरांना आहे.

गेल्या वर्षी उड्डाण पुलाला मंजुरी देण्यात आली. पुलासाठी सुमारे ३४ कोटी रुपये खर्च केला आहे. देहूरोड गुरुद्वारा ते रेल्वे उड्डाण पुलापर्यंत या पुलाचे काम आहे. त्यापैकी ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. देहूरोड शहरातील संघटना, पक्षांनी दहा वर्षांपासून पुलाच्या कामासाठी पाठपुरावा केला होता. आमदार बाळा भेगडे यांनीही सरकारी पातळीवर प्रयत्न केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुलाचे उद्‌घाटन होणार आहे.

Web Title: Dehuroad Flyover