Deka Triathlon Competition : चाळिशी गाठलेल्या प्रशांत हिप्परगींची डेका

दोन वेळ ‘आर्यनमॅन’ आणि ‘द हॉकमन ट्रायथलॉन’चा किताब मिळवणाऱ्या प्रशांत यांची ब्राझीलमध्ये होत असलेल्या ‘डेका ट्रायथलॉन’साठी निवड झाली आहे.
Prashant Hipparagi
Prashant Hipparagisakal
Summary

दोन वेळ ‘आर्यनमॅन’ आणि ‘द हॉकमन ट्रायथलॉन’चा किताब मिळवणाऱ्या प्रशांत यांची ब्राझीलमध्ये होत असलेल्या ‘डेका ट्रायथलॉन’साठी निवड झाली आहे.

पुणे - इच्छाशक्ती असेल तर आपण कोणत्याही वयात आपली स्वप्न पूर्ण करू शकतो. त्यासाठी योग्य मार्गदर्शन नसले किंवा पुरेसे पैसे नसले तरी स्वप्न पूर्ण करता येवू शकते हे इंजिनिअर असलेल्या प्रशांत हिप्परगी यांनी सिद्ध केले आहे. दोन वेळ ‘आर्यनमॅन’ आणि ‘द हॉकमन ट्रायथलॉन’चा किताब मिळवणाऱ्या प्रशांत यांची ब्राझीलमध्ये होत असलेल्या ‘डेका ट्रायथलॉन’साठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी निवड झालेले ते देशातील एकमेव स्पर्धेक आहे.

ब्राझीलमध्ये २० ते ३० मे दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. ‘डेका ट्रायथलॉन’चा किताब पटकावण्यासाठी त्यांना या १० दिवसांत ३८ किलोमीटर पोहणे, ४२२ किलोमीटर धावणे आणि एक हजार ८०० किलोमीटर सायकलिंग करायचे आहे. शरीर आणि इच्छाशक्तीचा अंत पाहणाऱ्या या स्पर्धेचा विजेता ठरण्यासाठी प्रशांत यांच्यापुढे दोन पर्याय होते. दोन ३.८ किलोमीटर पोहणे, ४२ किलोमीटर धावणे आणि १८० किलोमीटर सायकलिंग असा आयर्नमॅचा किताब असलेल्या १० ट्रायथलॉन १० दिवसांत पूर्ण करायच्या किंवा १० आयर्नमॅन स्पर्धेत जेवढे अंतर आहे तेवढे १० दिवसांत पूर्ण करायचे. त्यातील १० दिवसांत सर्व अंतर एकाचवेळी पूर्ण करण्याच्या स्पर्धेत प्रशांत सहभागी होणार आहे.

स्पर्धेसाठी ते रविवारी ब्राझीलला रवाना होणार आहेत. तत्पूर्वी त्यांना डीपी रस्‍त्यावर असलेल्या जोशी किचनजवळ सकाळी साडेसात वाजता शुभेच्छांसह निरोप देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशांत यांचे सहकारी सुधीर शिंदे यांनी दिली.

१०० किलो वजन असताना तयारी सुरू -

प्रशांत हे त्यांचा मुलगा प्रणित यांना घेऊन गार्डनमध्ये खेळण्यासाठी जात. त्यावेळी त्यांना अर्धा किलोमीटर देखील धावता येत नव्हते. कारण त्यावेळी ३५ वय असलेल्या प्रशांत यांचे वजन ९८ किलो होते. मात्र नंतर त्यांना धावण्यात रस निर्माण झाला. त्यामुळे त्यांनी तेव्हापासून अशा स्पर्धांची तयारी सुरू केली. गेल्या पाच वर्षांत त्यांनी अल्ट्रा ट्रायथलॉनमध्ये निवड होण्यापर्यंत मजल मारली आहे.

स्वतःचा स्वतःचे कोच -

आर्यन मॅनसारख्या स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी शरीराची क्षमता आणि त्यासाठी योग्य प्रशिक्षण आणि डाएट महत्त्वाचा असतो. त्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळाले तर लक्ष गाठणे काहीसे सोपे होते. मात्र प्रशांत यांनी स्वतः याबाबत अभ्यास केला स्वतः स्वतःचे कोच झाले. स्पर्धेसाठी कशी तयारी करायची, कोणता डाएट घ्यायचा हे सर्व त्यांनी स्वतःच पत्नी अनिता यांच्या मदतीने ठरवत अनेक स्पर्धा पुर्ण केल्या आहेत. विशेष म्हणजे प्रशांत आता ४० लोकांना प्रशिक्षण देत असून त्यासाठी कोणतेही शुल्क आकारत नाहीत.

कोणत्याही स्पर्धेसाठी मनाची तयारी आणि शरीराची साथ महत्त्वाची असते. पुरेसे आर्थिक पाठबळ आणि कोणतेही मार्गदर्शन नसताना मी केवळ इच्छाशक्तीच्या बळावर येथपर्यंत पोचलो आहे. या सर्वांत कुटुंबाची साथ महत्त्वाची ठरली. जानेवारी महिन्यापासून सात्यात्याने मी या स्पर्धेची तयारी करीत आहे. नऊ दिवसांत ही स्पर्धो पूर्ण करेल असा विश्‍वास आहे.

- प्रशांत हिप्परगी, अल्ट्रा ट्रायथलीट

प्रशांत यांनी मिळवलेले किताब -

- आर्यनमॅन - दोन वेळा

- द हॉकमन ट्रायथलॉन

- नागपूरमध्ये आयोजित ट्रायथलॉनमध्ये पहिला क्रमांक

- काश्‍मीर ते कन्याकुमारी सायकलींग (३७५० किलोमीटर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com