पाणी वाटपाच्या नियोजनाअभावी शेतकऱ्यांना पाणी मिळण्यास उशीर

राजकुमार थोरात 
गुरुवार, 12 एप्रिल 2018

वालचंदनगर (पुणे) : धरणामध्ये मुबलक पाणी साठा अाहे. मात्र पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे पाणी वाटपाचे नियोजन नसल्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना नीरा डाव्या कालव्यातुन शेतीसाठी उन्हाळी पाण्याचे आवर्तन मिळण्यास उशीर होत असल्याची मत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.

लासुर्णे (ता.इंदापूर) जवळील कर्दनवाडी येथे पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये आयोजित केलेल्या सेवापुर्ती कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य अॅड. हेमंतराव नरुटे, उद्योजक वसंत मोहोळकर, अर्बन बँकेचे संचालक वसंतराव पवार, शहाजी शिंदे, संग्राम निंबाळकर, उल्हास जाचक,महादेव जाधव,महादेव चव्हाण, संतोष लोंढे,विजय मचाले,पोपट वाघमोडे, रामभाऊ मुळीक, उपस्थित होते.यावेळी पाटील यांनी सांगितले की, चालू वर्षी नीरा खोऱ्यातील धरणामध्ये मुबलक पाणी साठा आहे. मात्र पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या पाण्याच्या नियोजनामध्ये त्रुटी राहत आहेत. कालव्याचे उन्हाळी हंगामाचे पाणी सर्व शेतकऱ्यांना वेळत मिळणे गरजेचे असताना देखील नियोजनाअभावी पाणी  मिळण्यास दिरंगाई होते. गतवर्षी तालुक्याच्या पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी मिळाले नसल्यामुळे सात हजार एकरावरील  पिके जळाली होती. यावर्षी सर्व शेतकऱ्यांना वेळेमध्ये पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. 

यावेळी  मचालेवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका बेबी दत्तात्रय कार्वेकर यांच्या सेवापुर्ती निमित्त सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांनी सांगितले की, शिक्षक कुढूंबातील नवी पिढी घडविण्याचे काम करीत आहेत.

Web Title: delay for water supply due to lack of planning