जीएसटीबाबत शिष्टमंडळाकडून निर्मला सीतारामन यांची भेट

nirmala sitharaman
nirmala sitharaman

पुणे - वस्तू व सेवा करातील (जीएसटी) जाचक अटी व तरतुदी असलेल्या संगणक प्रणालीच्या विरोधात देशभरातील कर सल्लागार, व्यापारी, सनदी लेखापाल व संबंधित घटकांच्या एकूण २५० संघटनानी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘ऑल इंडिया रिकमेंडेशन कमिटी’च्या शिष्टमंडळाने नुकतीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कमिटीचे अध्यक्ष नरेंद्र सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेले मुख्य समन्वयक स्वप्नील मुनोत, पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार संघटनेचे अध्यक्ष विलास अहेरकर, माजी अध्यक्ष शरद सूर्यवंशी यांचा समावेश होता. या शिष्टमंडळाने सीतारमण व अनुराग ठाकूर यांच्यासोबतच खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, नवनीत राणा, रामचरण बोहरा, विनय सहस्रबुद्धे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेतली.

सोनावणे म्हणाले, ‘अर्थमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली. या कायद्याबाबत अडचण नसून, त्याच्या अंमलबजावणीतील त्रुटीमुळे प्रामाणिक आणि छोट्या उद्योजकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो, ही बाब शिष्टमंडळाने त्यांच्या निदर्शनास आणून दिली. जीएसटी भरायला उशीर झाल्यास, त्यात काही चुका झाल्यास होणारा दंड हा छोट्या उद्योजकांसाठी मारक आहे, हेही त्यांना सांगितले. या संदर्भातील सविस्तर माहिती अर्थमंत्रालयाकडे सोपविली आहे.

या बैठकीत उपस्थित केलेल्या त्रुटींबाबत अर्थमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्रुटी शोधण्याचे आदेश दिले आहेत. शिष्टमंडळाने एकूण ७६ त्रुटी निदर्शनास आणल्या असून, त्यासंदर्भात उत्तरे देण्याचे निर्देशही अर्थमंत्र्यांनी दिले आहेत. लवकरच याबाबत योग्य तो निर्णय घेऊन, असे आश्वासन सीतारामन यांनी दिले आहे.’

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com