दिल्लीतील सुप्रसिद्ध आईस्क्रीम पहिल्यांदाच पुण्यात

कोरोना महामारीमध्ये फॅब्रिकेशन व्यवसाय बंद पडला, अन् बॉम्बे रोलर फ्रुट्स आईस्क्रीमच्या नव्या व्यवसायाची संधी साधली.
Bombay Roller Fruit Icecream
Bombay Roller Fruit IcecreamSakal
Summary

कोरोना महामारीमध्ये फॅब्रिकेशन व्यवसाय बंद पडला, अन् बॉम्बे रोलर फ्रुट्स आईस्क्रीमच्या नव्या व्यवसायाची संधी साधली.

कॅन्टोन्मेंट - कोरोना (Corona) महामारीमध्ये फॅब्रिकेशन व्यवसाय (Fabrication Business) बंद पडला, अन् बॉम्बे रोलर फ्रुट्स आईस्क्रीमच्या (Bombay Roller Fruit Icecream) नव्या व्यवसायाची (Business) संधी साधली. व्यवसाय बंद पडला, कोरोनाचे दडपण दिवसेंदिवस वाढत होते. व्यवसाय बंद पडला, तर व्यावसायिक स्वस्थ बसत नाही, तो नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो, त्याच पद्धतीने मित्राच्या मदतीने फ्रूट आईस्क्रीमचा व्यवसाय सुरू केल्याचे यासीम शेख यांनी सांगितले.

कोंढव्यातील मोहम्मद यामिन शेख आणि शाहिद खान या जोडीने दिल्लीमध्ये सुप्रसिद्ध असलेली आईस्क्रीम पहिल्यांदाच पुणेकरांसाठी आणली आहे. कॅम्प भागात भवानी पेठ व एम.जी. रोड, पूना कॉलेजच्या रस्त्यावर सुरू केली आहे. उन्हाळा, पावसाला, थंडी असली तरी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाला आईस्क्रीम आवडते. त्यात उन्हाळ्यामध्ये घशाला थंडावा देण्यासाठी दुपारी आणि सायंकाळी आईस्क्रीमच्या दुकानाकडे आपोआप पावले वळतात. बाहेर कोणते हवामान आहे याने काही फरक पडत नाही, देशभरातील खाद्यपदार्थांसाठी आइस्क्रीम ही सर्वात लोकप्रिय मिष्टान्न आहे. थंड आईस्क्रीम खाण्याचा आनंद हा तोंडात वितळल्याशिवाय आनंद मिळत नाही.

आईस्क्रीम नाही, त्यामध्ये वेगळेपण आहे, हे जाणून घ्यायलाच पाहिजे. बर्फाने भरलेल्या रोलर वर पाने फिरवत ही आईस्क्रीम तयार केली जाते. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे आईस्क्रीम बनविण्यासाठी केळे, डाळिंब, कलिंगड, पायनॅपल, किवी, ऑरेंज, अंजीर, आंबा, स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रुट अशा सर्व प्रकारची ताजी फळे, काजू बदाम, दूध, आणि खवा अशा मिश्रणाने फ्रीज आणि केमिकलशिवाय तयार केली जाते. अशा प्रकारची आईस्क्रीम १५-२० मिनिटांत तयार करून एका बाऊलमध्ये सर्व्ह करीत त्यावर रोझ वॉटर सिरप टाकला जातो. आईस्क्रीम खाण्याबरोबर तयार करतानाचा बघण्याचा आनंद खवय्यांना जास्त गोड वाटतो. किंमत ही 20 ते 50 रुपये पर्यंत असल्याने मध्यमवर्गीयांना हे घेणं परवडत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com