गर्भवतींसाठी आता दोन प्रसूती व्हॅन

गर्भवतींसाठी सुरू केलेली रुग्णवाहिका.
गर्भवतींसाठी सुरू केलेली रुग्णवाहिका.

पुणे - गरीब गर्भवतींना आता सहजगत्या प्रसूतीसाठी रुग्णालयांपर्यंत पोचता येणार आहे. त्यासाठी महापालिकेने दोन स्वतंत्र प्रसूती व्हॅन उपलब्ध करून दिल्या आहेत. विशेष म्हणजे, राज्य सरकारही आणखी दोन स्वतंत्र व्हॅन पुरविणार आहे. गर्भवती महिलांची हेळसांड होत असल्याकडे विशेष वृत्तमालिकेद्वारे ‘सकाळ’ने लक्ष वेधले होते. 

महापालिकेने विविध रुग्णालयांत प्रसूतिगृहे सुरू केली असली, तरी गर्भवतींसाठी अपुऱ्या सुविधा असल्याचे समोर आले होते. विशेषत: स्त्रीरोगतज्ज्ञ, कर्मचारी कमी असलेली संख्या आणि प्रसूतिगृहांमध्ये गर्भवतींना प्रवेश देण्यास होणारी दिरंगाई, याबाबीही उघडकीस आल्या होत्या. परिणामी, शुभांगी जानकर या गर्भवतीला महापालिकेच्या रुग्णालयात वेळेत उपचार मिळाले नसल्याने तिचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर तिच्या मृत्यूची कारणे शोधली असता, शुभांगी यांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळाली नसल्याचे उघड झाले होते. 

या पार्श्‍वभूमीवर गर्भवतींसाठी स्वतंत्र प्रसूती व्हॅन असाव्यात, अशी भूमिका ‘सकाळ’ने मांडली होती. त्यानुसार दोन प्रसूती व्हॅन सुरू करण्याची घोषणा महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा राजश्री नवले यांनी केली होती. या प्रसूती व्हॅन सेवेत दाखल झाल्या आहेत. त्यांचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते शनिवारी उद्‌घाटन झाले.

प्रसूती व्हॅनची सेवा २४ तास सुरू राहणार असून, या व्हॅनची संख्या वाढविण्यात येईल. सध्या त्या कमला नेहरू रुग्णालयातून उपलब्ध होतील. ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे.
- राजश्री नवले, अध्यक्षा, महिला व बालकल्याण समिती

या असतील सुविधा 
  माता, बाळासाठी उपचार यंत्रणा   
  प्रसूतीतज्ज्ञ
  मदतनीस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com