23 समाविष्ट गावांसाठी मुळशी धरणातून 5 टीएमसी पाण्याची मागणी

राज्य सरकारकडे हा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporationsakal

पुणे : महापालिकेच्या (pune corporation) हद्दीत २०१७ मध्ये झालेल्या ११ गावांचा समावेश आणि आता नव्याने आलेल्या २३ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी मुळशी धरणामधून (mulshi dam) ५ टीएमसी पाणी पुणे (pune)शहरासाठी द्यावने असा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आला आहे. हा प्रस्ताव राज्य सरकारडे पाठविण्यात येणार आहे. (demand 5 tmc water mulshi dam inclusion 23 villages)

पुण्याला खडकवासला धरण प्रकल्पातून ११.५ टीएमसी पाणीसाठी राज्य सरकारकडुन मान्य आहे. तसेच भामा आसखेड धरणामधून २.६४ टीएमसी, पवनानदीमधून ०.३४ टीएमसी असा एकुण १४.४८ टीएमसी पाणीसाठा मंजूर आहे. पुण्याची लोकसंख्या वाढत असल्याने पाणी कोटा वाढवावा अशी मागणी गेल्या काही वर्षापासून महापालिका करत आहे. पण अद्याप त्यास मान्यता देण्यात आलेली नाही. यंदा देखील महापालिकेने १८.५८ टीएमसी पाण्याची मागणी केली आहे.

Pune Municipal Corporation
अपघातावेळी देणाऱ्या वैद्यकीय सेवेचे मिळणार प्रशिक्षण

गेल्या दोन तीन वर्षापासून मुळशी धरणाचे पाणी पुण्याला मिळावे यावर चर्चा सुरू आहे. महापालिका हद्दीपासून सुमारे ४० किलोमीटर लांब असलेल्या मुळशी धरणातून ५टीएमसी पाणी आणण्यासाठी पाटबंधारे विभागाची मान्यता मिळावू असा प्रस्ताव प्रशासनाने शहर सुधारणा समितीपुढे ठेवला आहे. महापालिकेच्या हद्दीमध्ये २३ गावांचा समावेश झाल्यामुळे शहराची पाण्याची गरज वाढली आहे. त्यामुळे वाढीव पाणीसाठ्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. यासह शहर सुधारण समितीमध्ये मान्यता मिळाली असून आता स्थायी समितीच्या मान्यतेनंतर मुख्यसभे समोर हा प्रस्ताव जाईल. तेथे मान्यता मिळाल्यानंतर हा प्रस्ताव राज्यसरकारकडे पाठवण्यात येणार आहे.

स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, 'मुळशी धरणात होत असलेल्या वीजनिर्मिती संदर्भात अहवाल देण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने एक समिती स्थापन केली होती. त्या अहवालासाठी महापालिका राज्य शासनाकडे पाठपुरावा करीत आहे. मुळशी धरणातून पुणे शहरासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली आहे.'

Pune Municipal Corporation
लोकअदालतीत ३३ हजार दावे निकाली

पुणे शहर

वर्ष पाण्याची गरज( टिएमसी)

२०१५-१६ - १३.३९

२०१६-१७ - १४.५६

२०१७-१८ - १६.६६

२०१८-१९ - १७.२१

२०१९-२० - १७.४८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com