अवसरी बुद्रुक तलाठी कार्यालय पाडणार्यांवर कारवाईची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तलाठी कार्यालय

अवसरी बुद्रुक तलाठी कार्यालय पाडणार्यांवर कारवाईची मागणी

पारगाव: अवसरी बुद्रुक आंबेगाव येथील महसूल विभागाच्या मालकीची ३७ वर्षाची जुनी तलाठी कार्यालयाची इमारत शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीररित्या गावातील दुधसंस्थेच्या पदाधिकार्यांनी ताबा मिळवण्याच्या उद्देशाने सदर इमारत पाडली असल्याने संबधितांवर जिल्हाधिकारी यांनी कडक कारवाई करावी अशी मागणी तहसीलदार यांना पाठवलेल्या निवेदनाव्दारे शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य अजित चव्हाण, स्वप्नील हिंगे व मनीषा फल्ले यांनी केली आहे.

या संदर्भात शिवसेनेने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अजित चव्हाण बोलत होते यावेळी शिवसेना तालुका प्रमुख कल्याण हिंगे पाटील, स्वप्नील हिंगे उपस्थित होते. श्री. चव्हाण पुढे म्हणाले सदर तलाठी कार्यालयाचे १९८५ साली बांधकाम करण्यात आले तेव्हा पासून तलाठी कार्यालय त्या इमारतीमध्ये सुरु होते.सदर कार्यालयात जागा अपुरी पडत असल्याने व इमारतीचे नूतनीकरणाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असल्याने या इमारतीमधील तलाठी कार्यालय जवळच दुसर्या इमारती मध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे.

इमारत बंद असल्याचा गैरफायदा घेत व १ मे शासकिय सुट्टी असल्याने त्या दिवशी इमारती शेजारील दुध संस्थेच्या पदाधिकार्यांनी जागा बळकावण्याच्या उद्देशाने इमारत पाडली असल्याचा आरोप केला आहे २ मे रोजी ग्रामपंचायत च्या मासिक मीटिंग मध्ये संबंधित विषयावर चर्चा झाली असता उपस्थित सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला व संबंधितावर फौजदारी स्वरूपाची कारवाई व्हावी अशी मागणी केली. ग्रामविकास अधिकारी मोहन गरजे यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना लेखी पत्र देऊन कारवाई करण्याबाबत सूचना दिली आहे. या संदर्भात शासनाने संबधितांवर कडक कारवाई करावी अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन करेल असा इशारा स्वप्नील हिंगे यांनी दिला आहे. तलाठी संकेत गवारी यांनी आज बुधवारी सकाळी पाडलेल्या इमारतीचा पंचनामा करून वरिष्ठांना अहवाल पाठवला आहे.

याबाबत गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले सदर घटनेबाबत ग्रामविकास अधिकारी यांच्या कडून सविस्तर माहिती मागितली आहे.

मंडलाधिकारी व्ही.एम. शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले इमारत पाडल्याची माहिती समजली असून गाव कामगार तलाठी पंचनामा करून अहवाल दिल्यानंतर कारवाई करण्याबाबत वरिष्ठांना कळविले जाईल.

अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव : येथील महसूल विभागाच्या मालकीची ३७ वर्षाची जुनी तलाठी कार्यालयाची इमारतशासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीररित्या पाडण्यात आली आहे.

-इमारती वरील कोनशीला

Web Title: Demand Action Against Demolished Avsari Budruk Talathi Office

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top