एसआरए योजनेतील बोगस लाभार्थ्यावर कारवाईची मागणी

बाबा तारे
गुरुवार, 14 जून 2018

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमधील  झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत (एसआरए) व्यावसायिक व्यक्तीला बोगस पध्दतीने दुकान मंजूर झाल्या प्रकरणी त्याविरोधात गुन्हा नोंद करून कारवाई करण्याची मागणी आरपीआय (आठवले गट) शहर उपाध्यक्ष रमेश ठोसर यांनी अप्पर उपायुक्त सुरेश जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पुणे  (औंध)- येथिल डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमधील  झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत (एसआरए) व्यावसायिक व्यक्तीला बोगस पध्दतीने दुकान मंजूर झाल्या प्रकरणी त्याविरोधात गुन्हा नोंद करून कारवाई करण्याची मागणी आरपीआय (आठवले गट) शहर उपाध्यक्ष रमेश ठोसर यांनी अप्पर उपायुक्त सुरेश जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

औंध येथिल परिहार चौकातील परिहार स्वीट या दुकानाचे मालक देवाराम परिहार यांनी स्वतःच्या मालकीचे दुकान व बाणेर भागात सहा सदनिका असतांनाही डाॅ.बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमधील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा गैरफायदा घेत दुकानासाठी अर्ज भरला होता. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या सरकारी नियमाप्रमाणे अर्जदार व्यक्तीच्या किंवा कुटूंबातील कुणाही व्यक्तीच्या नावे घर नसावे असा नियम असताना या नियमांचे उल्लंघन करत अर्ज भरला व छाणणी  प्रक्रियेत एसआरए विभागानेही हा अर्ज मंजूर करून त्यांना दुकान देण्यास मंजूरी दिली.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या सरकारी नियमांना धाब्यावर बसवून व मला कुठेही घर नसल्याचे खोटे शपथपत्र देऊन प्रशासनाची दिशाभूल करून लाभ घेत असल्याचे आढळून आल्याप्रकरणी परिहार यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ठोसर यांनी अप्पर उपायुक्त सुरेश जाधव यांच्याकडे केली आहे. ख-या लाभार्थ्याना योजनेपासून वंचित ठेवून धनदांडग्यांना या योजनेत समाविष्ट केल्या बद्दल सामान्य नागरीक व लाभार्थी या विरोधात तीव्र  नाराजी व्यक्त करत आहेत.

Web Title: Demand for action on bogus beneficiaries in SRA scheme