विद्युत प्रवाह देऊन मच्छिमार करणाऱयांवर कारवाईची मागणी

युनूस तांबोळी
बुधवार, 23 मे 2018

टाकळी हाजी (शिरूर, पुणे): शिरूर तालुक्यातील घोडनदी पाण्यामुळे कोरडी पडली असून, शेतकरी धरणाच्या पाण्याची वाट पाहत आहेत. नदी कोरडी पडल्याने ठाकर व मच्छीमार व्यवसायीकांनी नदीला गर्दी केली असून, पात्रातील पाण्याच्या डबक्यात विद्युत प्रवाह देऊन मच्छिमार करणाऱ्या व्यवसायीकांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक मच्छिमार करू लागले आहेत.

टाकळी हाजी (शिरूर, पुणे): शिरूर तालुक्यातील घोडनदी पाण्यामुळे कोरडी पडली असून, शेतकरी धरणाच्या पाण्याची वाट पाहत आहेत. नदी कोरडी पडल्याने ठाकर व मच्छीमार व्यवसायीकांनी नदीला गर्दी केली असून, पात्रातील पाण्याच्या डबक्यात विद्युत प्रवाह देऊन मच्छिमार करणाऱ्या व्यवसायीकांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक मच्छिमार करू लागले आहेत.

घोडनदी ही पावसाळ्यात चार महिने पाण्याने भरून वाहणारी नदी आहे. या नदीमुळे बेट भागाचे नंदनवन झाले आहे. या भागातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे स्थानिक शेतकऱ्यांना नवसंजीवनी ठरत आहेत. गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण अधिक असल्याने धरणात चांगलाच पाणीसाठा झाला होता. गेल्या महिन्यात उन्हाळी आवर्तन म्हणून धरणातून पाणी सोडण्यात आले होते. सध्या शिरूर तालुक्यातील घोडनदीचे पात्र पाण्यामुळे कोरडे पडले आहे. पाणी नसल्याने उन्हाळ्यात पिकांसाठी पाणी सोडणे आवश्यक झाले आहे. या भागातील शेतकरी या महिन्यातील उन्हाळी आवर्तनाची वाट पाहू लागले आहेत.

नदीच्या पात्रात काही ठिकाणी वाळू काढल्यामुळे खोल खड्डे पडले आहेत. या ठिकाणी पाईप सोडून शेतीसाठी पाणी नेण्याचे काम केले जाते. साचलेल्या डबक्यात थोडे पाणी राहिल्याने मच्छिमार करणाऱ्यांची गर्दी या पात्रात दिसू लागली आहे. काही मच्छिमार विद्युत करंट पाण्यात सोडून मच्छिमारी करीत आहेत. त्यामुळे लहान लहान माशाच्या गावरान जाती मरून पाण्यावर तंरगताना दिसत आहेत. काही मच्छिमार जाळ्याच्या सहाय्याने येथे मासेमारी करताना दिसतात. त्यांना कटला, चिलापी, गुगळ, शिंगटे या जातीचे मासे जाळ्यात अडकताना दिसतात. मासेमारी व्यवसाय करणारे याच ठिकाणी तीन दगडाची चुल मांडून स्वयंपाक करून यथेच्छ मच्छिवर ताव मारताना दिसतात. सध्या तरी हे नदीचे पात्र कोरडे पडल्याने या भागात मासेमारी करणाऱ्यांची गर्दी असून, एकेक मासेमारी करणारा 15 किलो पर्यंत मासेमारी करत आहेत. या पात्रात लवकरात लवकर धरणातून पाणी सोडण्यात यावे. अशी मागणी या भागातील शेतकरी करू लागले आहेत.
 
नदीत वेळेत पाणी सोडण्यात आले असते तर विद्युत करंड सोडून गावरान माशांची पिलावळ नष्ट झाली नसती. विद्युतकरंट देऊन मासे मारी करणाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षीत आहे, असे मासेमारी करणारे व्यवसायीक सर्जेराव माळी यांनी केली आहे.

Web Title: demand for action on fishermen issuing electricity