पिंपरी चिचवडमध्ये पूरग्रस्तांच्या संख्येत वाढ; आणखी अनुदानाची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

 पवना-मुळा पूरबाधितांची संख्या ३ हजार ५०० पर्यंत जाऊन पोचली असून त्यामध्ये, आणखी वाढ होण्याची शक्यता अप्पर तहसिलदार कार्यालयाने व्यक्त केली आहे. त्यामुळे, पूरग्रस्तांसाठी राज्य शासनाकडे आणखी सव्वा तीन कोटी रुपयांची मागणी कार्यालयाने केली आहे. 

पिंपरी चिंचवड : पवना-मुळा पूरबाधितांची संख्या ३ हजार ५०० पर्यंत जाऊन पोचली असून त्यामध्ये, आणखी वाढ होण्याची शक्यता अप्पर तहसिलदार कार्यालयाने व्यक्त केली आहे. त्यामुळे, पूरग्रस्तांसाठी राज्य शासनाकडे आणखी सव्वा तीन कोटी रुपयांची मागणी कार्यालयाने केली आहे. 

अप्पर तहसिलदार गीता गायकवाड म्हणाल्या, "पूरग्रस्त भागातील पंचनामे अंतिम टप्प्यात आले आहेत. यापूर्वी, पूरग्रस्तांची संख्या २ हजार ८०० इतकी होती. मात्र, त्या संख्येत वाढ झाली आहे. मंडल अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामे केले आहेत.परंतु, कोणाची मागणी असल्यास ती तपासून घेण्याच्या सूचना त्यांना करण्यात आल्या आहेत."अन्नधान्य वितरण ला यादी पाठविण्याचे काम चालू.. 

पूरग्रस्तांना प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या आर्थिक मदतीबरोबरच १० किलो गहू आणि तेवढेच तांदूळ दिले जाणार आहे.  अन्न धान्य वितरण अधिकारी कार्यालयाला पूरग्रस्तांची यादी पाठविण्याचे काम सुरू आहे. ज्या पूरग्रस्तांचे शहरातील बँकेत खाते आहे. त्यांनाच आर्थिक मदत दिली जाईल. बाहेर राज्यात बँक खाते असल्यास त्यांना मदत मिळणार नाही, असेही गीता गायकवाड यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for additional Money due to Increase in number of flood victims in Pimpari Cinchwad