कोरोना अन् दारूविक्रीबाबत 'हे' आमदार महोदय काय म्हणतायेत पाहा....

राजेंद्रकृष्ण कापसे 
Wednesday, 6 May 2020

पोलिसांवरील ताण वाढत असल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उत्पादन शुल्क मंत्री यांना केला पत्र व्यवहार 

खडकवासला (पुणे) : शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच फौजदाराचा कोरोनामुळे मृत्यू झालाय, कामगार वर्ग गावी जाण्यासाठी आक्रमक होतोय असे असताना आता मद्य विक्री सुरू झाली. अनियंत्रित गर्दीमुळे कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. पोलिसांना अनेक ठिकाणी बळाचा वापर करावा लागला आहे. त्यामुळे, तातडीने मद्य विक्री बंद करावी, अशी मागणी खडकवासला येथील आमदार भीमराव तापकीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार, उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. 

MLA Bhimrao Tapkir (@MlaTapkir) | Twitter

आणखी वाचा- वडिलांच्या डोक्‍यात बॅट घालून खून केला अन्...

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यासह राज्यात दारू विक्री सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने काढल्यानंतर सर्वच ठिकाणी दारू खरेदीसाठी एकच झुंबड उडाल्याचे चित्र सोमवारपासून दिसून आले. दुकाने उघडण्यापूर्वीच मद्यप्रेमींनी दुकानांसमोर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिणामी, दोन व्यक्तींमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पुरता बोजवारा उडाला होता. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

शहरात ठिकठिकाणी अनियंत्रित गर्दीमुळे कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांना अनेक ठिकाणी बळाचा वापर करावा लागला. मद्य विक्रीची दुकाने बंद करावी लागली. पुणे शहरात अनेक ठिकाणी विक्री सुरू झाली आहे. पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये बहुतेक दुकाने उघडली असल्याचे निदर्शनास आले. दारू विक्रीला मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. 

 आणखी वाचा - घसा ओला करण्यासाठी तळीरामांची झुंबड, लॉकडाऊनचा फज्जा

तेथे देखील मद्य प्रेमी एकच गर्दी होत आहे. पुणे शहर जिल्हात दारू विक्री सुरू करण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा असून तो घातक ठरणार आहे. सद्य:स्थितीत पोलिस प्रशासनावर ताण वाढलेला आहे. त्यामुळे शहरात दारू विक्रीबाबतचा असा निर्णय घेणे गरजेचे नव्हते. सोमवारी शहरात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एका सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे.

शहरात अनेक ठिकाणी दाट लोकवस्तीचा भाग आहे. येथे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. परिणामी, गंभीर परिस्थिती उद्‌भवू शकते. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार होऊन पुणेकरांच्या जिविताच्या सुरक्षेसाठी शहरातील मद्य विक्री तात्काळ स्थगिती करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी केली आहे. 

आणखी वाचा- वडिलांच्या डोक्‍यात बॅट घालून खून केला अन्...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: demand for ban liquor selling in pune