पवना नदी घाट सुशोभिकरणाची मागणी 

रमेश मोरे
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

जुनी सांगवी - जुनी सांगवी येथील पवना नदीकाठावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटाचे नुतनिकरण व सुशोभिकरण करण्यात यावे अशी मागणी येथील अहिल्यादेवी प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहर संघटनेच्या पालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट सांगवी,नवी सांगवी' या घाटाचे सुशोभिकरण व नुतनीकरण करण्यासंबंधी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

या घाटावर दशक्रिया विधी, गणपती विसर्जन, नवरात्र धार्मिक कार्यक्रम, देवीच्या मूर्तीचे विसर्जन व इतर धार्मिक कार्यक्रम केले जातात.सध्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत सध्या असलेली उपलबध जागा व सुविधा  नागरिकांची संख्या लक्षात घेता अपु-या पडतात. यामुळे नागरिकांची गैरसोय होते.

येथील पत्रा शेड काढुन सिमेंट स्लॅब टाकावा.पावसाळ्यात पुराचे पाणी,कचरा घाण घाटावर येते यासाठी घाटाची उंची वाढवावी. शेजारीच असलेले पालिकेचे कचरा संकलन केंद्रामुळे या परिसरात दुर्गंधी पसरते.येथील कचरा संकलन अन्यत्र हलवावे अथवा नियमित स्वच्छता करावी.येथे जवळच असलेल्या नाल्यावर सिमेंट स्लॅप  घालुन उघडा नाला बंद करावा. प्रवेशद्वारावर घाटाच्या नावाची सिमेंट कॉक्रिट कमान करण्यात यावी अशा आशयाचे मागण्याचे निवेदन अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठान च्या वतीने  देण्यात आले. या संबंधी स्थायी समोर विषय ठेवण्यात आले आहेत. त्यातील काही विषय मंजूरही करण्यात आल्याचे समजते. मात्र प्रत्यक्ष कामास अद्याप सुरुवात झालेली नाही. येथील कामाची तात्काळ सुरूवात करावी अशी मागणी प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनावर श्री किसन फसके, अनुराज दुधभाते, बाळासाहेब वाकोडे, अनिल कुचेकर, योगेश हुगे, अविनाश भंडारे, अशोक वाघे, निलेश गाडेकर आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Demand for beautification of Pawana river valley