पुण्यातील कोविड सेंटरमध्ये 'हे' कसले प्रकार सुरू आहेत...

covid.jpg
covid.jpg

बालेवाडी : येथील निकमार कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना रुग्णांकडून व्यसनांसाठी काहीही करण्याचे प्रकार सुरु आहेत. दारूच्या बाटल्या आणि गुटख्याच्या पुड्यांसाठी या सेंटरमधील वाढप्यांना हाताशी घेऊन या गोष्टी सेंटरमध्ये आणण्याचा प्रयत्न केला येथील कोरोना रूग्ण. परंतु या गोष्टी गेटपर्यंत पोहोचल्या खऱ्या पण गेटवरील सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.

तीन महिन्यांपूर्वी नातेवाईकानी डब्याच्या पिशवीतून दारू पुरवण्याचा प्रयत्न केला होता. पण तोही सुरक्षा रक्षकांकडून पकडला गेला होता. इकडे कोरोनाचा नायनाट करण्यासाठी शासन अहोरात्र झटत आहे, आणि रुग्ण मात्र दारू आणि गुटका यांसारख्या गोष्टी आपल्यापर्यंत कशा पोहचतील यासाठी नवनवीन युक्त्या लढवत आहेत.

बालेवाडी येथील महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केले जातात. या ठिकाणी त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे स्वच्छता करणे किंवा या लोकांना जेवण वाढणे या कामासाठी येथे अनेक कर्मचारी नेमण्यात आले आहेत. येथील जेवण वाढणाऱ्या वाढप्यांकडूनच याठिकाणी गाडीच्या डिक्कीत मधून लपवून दारू आणि तंबाखू, गुटखा आणून या ठिकाणी रुग्णांना पुरविण्याचा प्रयत्न केला गेला. पण सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.

असे प्रकार या ठिकाणी वारंवार घडत आहेत. त्यामुळे अशा मद्याची, गुटखा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले असल्याची माहिती औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे साहय्यक आयुक्त जयदीप पवार यांनी दिली. त्याचबरोबर या कर्मचाऱ्यांनी ही दारू किंवा गुटखा रुग्णांसाठी आणला नसून, तो स्वतःसाठीच सोबत आणला असल्याचेही कबूल केले असल्याचे त्यांनी सांगितले.

जर करोनासारख्या महाभयंकर साथीच्या काळातही कोरोना  रुग्ण जर दारू आणि गुटख्यासाठी कधी नातेवाइकांकडील डब्याच्या पिशवीत, तर कधी  कर्मचार्याना पैशाचे आमिष दाखवून असे प्रकार करत असतील तर सरकारने कितीही प्रयत्न केले, तरी जोपर्यंत सामान्य नागरिक त्याला साथ देत नाहीत तोपर्यंत सगळं व्यर्थ आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com