पुरातत्व विभागाचे बी.बी.जंगले यांची बदली रद्दची मागणी

दत्ता म्हसकर
शनिवार, 30 जून 2018

जुन्नर (पुणे) : शिवनेरी संवर्धन आणि विकास प्रकल्पामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे पुरातत्व विभागाचे संवर्धन सहाय्यक बी.बी.जंगले यांची रायगड प्राधिकरणावर झालेली बदली रद्द करण्यात यावी, अशी मागणी सह्याद्री गिरीभ्रमण संस्था आणि शिवाई देवी मंदिर ट्र्स्टच्या वतीने केंद्र आणि राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.त्यांच्या बदलीमुळे शिवनेरी विकासाला खिळ बसण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. 

खासदार शिवाजीराव आढळाराव पाटील यांनी केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबतचे पत्र दिले आहे. शिवनेरी संवर्धन आणि विकास प्रकल्पा अंतर्गत पुरातत्व विभागाकडुन संवर्धनाची कामे सुरु अाहेत. ही कामे अर्धवट अवस्थेत असून, विविध कामे प्रस्तावित आहेत. अशा स्थितीत पुरातत्व विभागाच्या अधिकारी बी.बी.जंगले यांची बदली करणे संयुक्तीक नसल्याचे नमूद केले आहे. 

शिवाई देवी ट्रस्टने जंगले यांची बदली रद्द करण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाचे मुंबई अधीक्षक बिपीनचंद्र नेगी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या कार्यकाळात संवर्धनाची कामे झाली असून काही कामे शिल्लक आहेत ही कामे पुर्ण हाेई पर्यंत जंगले यांची बदली रद्द करावी अशी मागणी केली. 

Web Title: demand to cancel transfer of officer of archaeology department b b jangale