यशवंत साखर कारखान्यासाठी शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना साकडे 

uddhav
uddhav

केसनंद (पुणे) : शिरूर विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाचा प्रश्‍न व शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा आणि पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर ते शिरूर या टप्प्यातील रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळावी, अशा मागण्या पुणे जिल्हा शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आल्या. याप्रश्नी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके यांनी दिली.

शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळ भेटले. त्या वेळी या मागण्या करण्यात आल्या. तसेच, शिरूर विधानसभा मतदार संघातील महत्त्वाचे प्रश्‍न मांडण्यात आले. या वेळी जिल्हाप्रमुख कटके, खेडचे माजी आमदार सुरेश गोरे, जिल्हा युवा सेना अधिकारी मच्छिंद्र सातव व इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. या वेळी ठाकरे यांचे निवडीबद्दल अभिनंदन करण्यात आले. 

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला यशवंत कारखाना सुरू व्हावा, ही येथील सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे. हा विषय राज्य सरकारकडे अनेकदा मांडूनही अद्याप यावर तोडगा निघू शकलेला नाही. यावर योग्य तो तोडगा काढावा, पुणे-नगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी आहे. येथे रोजच वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे प्रवाशांना तासन्‌ तास रांगेत तिष्ठत राहावे लागते. त्यासाठी सरकारने वाघोली ते शिक्रापूर या कामासाठी हायब्रीड अन्युईटीमधून मंजुरी दिली आहे. मात्र, शिक्रापूर ते शिरूर या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत येणाऱ्या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे अडलेले हे काम त्वरित मार्गी लागावे, असे साकडे पुणे जिल्हा शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री ठाकरे यांना घालण्यात आल्याचे कटके यांनी सांगितले. या दोन्ही प्रश्‍नी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com