बारामतीतील विद्यार्थ्यांसमोर हा धोका, पोलिसांकडून मात्र दुर्लक्ष

मिलिंद संगई
Thursday, 18 June 2020

या संदर्भात शाळांच्या मुख्याध्यापकांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित वाहनचालकांवर कारवाईच केली जात नाही. शाळांच्या दारातच वाहने लावल्याने मुलांना शाळेत जाणेही अनेकदा अवघड होऊन बसते.

बारामती (पुणे) : बारामती शहरातील सिध्देश्वर गल्लीतील शाळांमधील विद्यार्थ्यांना येथे होणाऱ्या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या संदर्भात पोलिसांना वारंवार पत्र देऊनही या गाड्यांवर काहीही कारवाई होत नसल्याने पालकही वैतागून गेले आहेत. 

पंढरपूरची वारी करण्यासाठी तरुणाने लडढवली शक्कल     

या ठिकाणी नगरपालिकेच्या तीन शाळा आहेत. या शाळेत मिळून पाचशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेसमोरील रस्ता हा चार चाकी वाहने पार्किंग करण्याची जागा होऊन बसल्याने शाळातील विद्यार्थी, शिक्षक व पालकांनाही त्याचा त्रास होतो. तासनतास लोक गाड्या य़ेथे पार्किंग करुन जातात.

एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर

या संदर्भात शाळांच्या मुख्याध्यापकांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित वाहनचालकांवर कारवाईच केली जात नाही. शाळांच्या दारातच वाहने लावल्याने मुलांना शाळेत जाणेही अनेकदा अवघड होऊन बसते. चार चाकी गाडी मागे घेताना अपघाताचा येथे धोका आहे. विद्यार्थी येथे खेळत असतात त्यांनाही या गाड्यांपासून धोका होऊ शकतो. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या बाबी विचारात घेता येथील पार्किंग बंद करावे, अशी संबंधितांची मागणी आहे. पोलिसांकडून या ठिकाणी पार्क होणा-या गाडीचालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand to close parking in front of school in Baramati