पाडलेल्या बांधकामाची पालिकेकडे भरपाईची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

जुनी सांगवी (पिंपरी) : येथील वसंतदादा पुतळा प्रियदर्शनी नगरातील इमारत पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने पाडली. त्यामुळे काची कुटुंबीय नुकसानभरपाई द्यावी, या मागणीसाठी धरणे आंदोलनास बसले आहेत. 

भाऊबंदकीच्या वहिवाटीच्या तक्रारीवरून महापालिकेने 14 मेपासून तीन दिवस कारवाई करून इमारत पाडली होती. मिळकतकर भरला जात होता. इमारत नियमितीकरणासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू होती. येथील सरिता काची यांनी वहिवाट रस्त्यासाठी न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाच्या निकालानंतर पालिका प्रशासनाने इमारत पाडली. 

राजकीय दबावापोटी इमारत पाडली, असा आरोप काची कुटुंबाने केला. नुकसानभरपाई व न्याय मिळावा, यासाठी धरणे आंदोलन करत आहोत, असे अमित काची, राजेश काची, धनू काची, अशोक काची यांनी सांगितले. 

Web Title: Demand for compensation for the damaged constructions