बारामती: उपविभागीय अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी

मिलिंद संगई
बुधवार, 16 मे 2018

बारामती - उपविभागीय अधिकारी हेमंत निकम व तहसिलदार हनुमंत पाटील यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली. दरम्यान हेमंत निकम यांनी आपण नियमानुसारच आपले काम करत असल्याचा खुलासा केला आहे.

बारामती - उपविभागीय अधिकारी हेमंत निकम व तहसिलदार हनुमंत पाटील यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली. दरम्यान हेमंत निकम यांनी आपण नियमानुसारच आपले काम करत असल्याचा खुलासा केला आहे.

भाजपच्या वतीने आसिफ खान, राजेश कांबळे, मुकेश वाघेला, सतीश फाळके यांनी आज पत्रकार परिषद घेत हेमंत निकम व हनुमंत पाटील हे पालकमंत्री बारामतीत आल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी जात नाहीत. मात्र स्थानिक आमदारांच्या निवासस्थानी बैठकांसाठी उपस्थित राहतात.  महाराष्ट्र दिनी देखील पालकमंत्र्यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला हेमंत निकम उपस्थित राहिले नाहीत. बारामतीतील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला सातत्याने त्यांची उपस्थिती असते, असे आरोप यावेळी करण्यात आले. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. एका विशिष्ट राजकीय पक्षाला झुकते माप हे दोन्ही अधिकारी करत असल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला.या संदर्भात मुख्यमंत्री, महसूलमंत्री, विभागीय आयुक्त व जिल्हाधिका-यांना माहिती दिल्याचे आसिफ खान यांनी सांगितले. 

दरम्यान हेमंत निकम यांनी हे आरोप फेटाळले असून, आम्ही आमचे काम नियमानुसारच करत आहेत. तसेच पालकमंत्री व अन्य मंत्री बारामतीत आल्यावर आम्ही त्यांची भेट घेतो असा खुलासा केला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला झुकते माप देण्याचा प्रश्नच येत नाही, असेही त्यांनी नमूद केले. 

Web Title: Demand for disciplinary action against sub-divisional officers