अपंगांसाठी तालुकास्तरीय समिती स्थापन करण्याची मागणी

wagholi
wagholi

वाघोली - अपंगांसाठी असलेला तीन टक्के राखीव निधी योग्य खर्च व्हावा व त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी तालुकास्तरीय समिती स्थापन करण्याचा अध्यादेश राज्य शासनाने तीन वर्ष पूर्वी काढला आहे. मात्र पुरंदर व जुन्नर वगळता पुणे जिल्ह्यात एकाही तालुक्यात समिती स्थापन करण्यात आलेली नाही. ही समिती स्थापन करावी तसेच समिती स्थापन न करणाऱ्यां अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेने जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे.

तालुकास्थरावर आमदार यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार यांची सचिवपदी नियुक्ती करून ही समिती स्थापन करण्याचा अध्यादेश शासनाने तीन वर्ष पूर्वी काढला आहे. मात्र याकडे अद्याप दुर्लक्ष करण्यात आले आहे. पालकमंत्री ,समाजकल्याण अधिकारी, जिल्हाधिकारी यांनीही समिती त्वरित स्थापन करण्याचे लेखी आदेश व सूचना सर्व तालुक्यातील तहसीलदाराना दिल्या होत्या. तसेच समिती स्थापन करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र तरीही या आदेशाकडे दुर्लक्ष करण्यात आले. समिती गठीत होत नसल्याने ग्रामपंचायत, नगरपरिषद अपंगांचा तीन टक्के निधी वेळेवर खर्च करीत नाही, अपंगांच्या हिताच्या योजना राबविल्या जात नाही, अपंग आपल्या हक्कापासून वंचित राहतात. संघटनेच्या सुप्रिया लोखंडे, धर्मेन्द्र सातव, रमेश शिंदे, बाळू काळभोर, दादा आल्हाट, विशाल गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली.

शासनाने अध्यादेश काढून तीन वर्षे झाले. मात्र तरी पुणे जिल्ह्यात पुरंदर व जुन्नर तालुका वगळता कुठेही समिती स्थापन झाली नाही. समिती स्थापन करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. समिती लवकर स्थापन न झाल्यास अपंगांना रस्त्यावर उतरावे लागेल. 
-धर्मेंद्र सातव, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com