RTE Admission : आरटीई ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरण्याची तारीख वाढवण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

demand for extension of date for filling RTE online admission form education

RTE Admission : आरटीई ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरण्याची तारीख वाढवण्याची मागणी

पुणे : आरटीई ऑनलाईन प्रवेश भरण्याची अंतिम तारीख वाढवून मिळणे बाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे .पालकांना प्रवेशासाठी ऑनलाईन फॉर्म भरताना वेबसाईटच्या विलंबामुळे फॉर्म भरण्यास उशीर होत होता.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क (आरटीई) कायद्याअंतर्गत प्रवेश प्रक्रियेत अनेक एजंट लोक या योजनेच्या नियमावलीत पात्र नसलेल्या पालकांकडून पैसे मागून प्रवेश प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आमिष दाखवत आहेत.

तरी प्रवेश प्रकिया कायदेशीर नियमानुसार करावी अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कोथरूड विधानसभेचे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण उपसंचालक, पुणे औदुंबर उकिरडे आणि प्राथमिक शिक्षण अधीक्षक गणेश खाडे यांना सादर करण्यात आले.

आरटीई प्रवेश प्रक्रियेत खरोखरच आर्थिक दुर्बल घटक पालक योजनेपासून वंचित रहात आहेत. ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया असली तरी अनेक ठिकाणी सुरु असलेल्या या एजंटगिरीला बळी पडून पालकांची होत असलेली फसवणूक थांबविण्यात यावी. खरोखर आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांनाच या प्रक्रियेचा लाभ मिळावा.

कोणत्याही गरजू विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही असे आश्वासन प्रशासनाने द्यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करत आहोत असे गिरीश गुरनानी यांनी सांगितले. या वेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस कोथरूड विधानसभेचे कार्याध्यक्ष मोहित बराटे देखील उपस्थित होते.

टॅग्स :educationRTEAdmission