विद्यार्थ्यांना दाखले वेळेत देण्याची मागणी

रमेश मोरे
बुधवार, 6 जून 2018

जुनी सांगवी - सध्या दहावी व बारावी परिक्षेच्या निकालानंतर महाविद्यालयीन प्रवेशासाठी लागणा-या विविध दाखले प्रमाणपत्रासाठी विद्यार्थी व पालकांची लगबग सुरू आहे.स्थानिक पातळीवरील तलाठी कार्यालय, महाई सेवा केंद्र, ईत्यादी ठिकाणी विविध दाखल्यांसाठी गर्दी होत आहे. तलाठी कार्यालयातुन लागणारे दाखले विद्यार्थी पालकांना वेळेत द्यावेत याबाबत भाजपा विद्यार्थी आघाडीचे ललित म्हसेकर यांनी जुनी सांगवी येथील तलाठी कार्यालयास निवेदन दिले आहे.

जुनी सांगवी - सध्या दहावी व बारावी परिक्षेच्या निकालानंतर महाविद्यालयीन प्रवेशासाठी लागणा-या विविध दाखले प्रमाणपत्रासाठी विद्यार्थी व पालकांची लगबग सुरू आहे.स्थानिक पातळीवरील तलाठी कार्यालय, महाई सेवा केंद्र, ईत्यादी ठिकाणी विविध दाखल्यांसाठी गर्दी होत आहे. तलाठी कार्यालयातुन लागणारे दाखले विद्यार्थी पालकांना वेळेत द्यावेत याबाबत भाजपा विद्यार्थी आघाडीचे ललित म्हसेकर यांनी जुनी सांगवी येथील तलाठी कार्यालयास निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की सध्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी विविध दाखल्यांची गरज असते.स्थानिक कार्यालयामधुन विद्यार्थ्यांना संबंधित प्रमाणपत्रे दाखले वेळेत मिळाल्यास विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रकियेसाठी वेळ मिळेल. अनेकदा दाखले व कागदपत्रांची जुळवा जुळव करताना केवळ स्थानिक कार्यालयांमधुन वेळेत दाखले न मिळाल्याने विद्यार्थी व पालकांची दमछाक होते.सर्वच स्थानिक कार्यालयामधुन विद्यार्थ्यांना लागणारे दाखले वेळेत देण्यात यावे. याबाबत जुनी सांगवी,पिंपळे गुरव,नवी सांगवी भागातील कार्यालयामधुन भाजपा विद्यार्थी आघाडीच्या वतीने  निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. 

तलाठी कार्यालयातुन सध्या उत्पनाचा दाखल्या ऐवेजी चौकशी अहवाल या नावाने प्रमाणपत्र दिले जाते. याचबरोबर नॉनक्रिमिलियर साठी लागणारी प्रमाणपत्रे आमच्याकडुन तात्काळ दिली जातात. 
-श्री अर्जुन नाचण, तलाठी कार्यालयीन मदतनिस जुनी सांगवी. 
 

Web Title: Demand for giving certificates to students in time

टॅग्स