शिरवळमधील ऐतिहासिक पाणपोई जतनाची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

नसरापूर - शिरवळ (ता. खंडाळा) येथील ऐतिहासिक पाणपोई पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणात रस्त्याच्या मध्ये येते. या पाणपोईस वाहनांची धडक बसून अपघात; तसेच वास्तूचे नुकसानही होऊ शकते. त्यामुळे महामार्गालगत जमीन संपादित करून ही वास्तू तिथे स्थलांतरित करावी, अशी मागणी किल्ले संवर्धन समितीचे सदस्य चंद्रशेखर शेळके यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पुणे-सातारा महामार्गावर शिरवळ हद्दीतील नायगाव फाट्याजवळ तेराव्या शतकातील हेमाडपंथीय घडीव दगडातील पाणपोई आहे. ती आजपर्यंत टिकून आहे. पूर्वीच्या काळी वाटसरूंची तहान भागविण्यासाठी ही पाणपोई उभारण्यात आलेली असावी. आजही ती सुस्थितीत असल्याने रस्तारुंदीकरणात पाडू नये म्हणून रायरेश्वर प्रतिष्ठानचे शेळके यांनी २०११ पासून याबाबत पाठपुरावा करून सर्व संबंधितांना या वास्तूचे जतन करावे, अशी मागणी करत आहेत. शेळके यांची राज्याच्या दुर्ग संवर्धन समितीवर निवड झाल्यावर त्यांनी ही पाणपोई न पाडता तिचे संवर्धन होण्याबाबत  समितीत ठराव केला. त्यानुसार पुरातत्त्व विभागाने पाणपोईच्या जतनासाठी पुनर्उभारणी करण्याबाबत महामार्ग प्राधिकरणास कळविले. त्यावर महामार्ग प्राधिकरणाने ही पाणपोई न पाडता रस्त्याचे मध्ये ठेवून एका बाजूने महामार्ग, तर दुसऱ्या बाजूने सेवा रस्ता केला आहे. ही पाणपोई महामार्गालगत जागा संपादित करून त्या ठिकाणी तिची पुनर्उभारणी करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

Web Title: Demand for the historical waterfall in Shirwal