लिनिअर गार्डन रहाटणीपर्यंत वाढवा - नगरसेवक नाना काटे

मिलिंद संधान
मंगळवार, 3 एप्रिल 2018

नवी सांगवी (पुणे) : पिंपळे सौदागर येथील नव्याने विकसित होत असलेले लिनिअर गार्डन रहाटणी पर्यंत वाढविण्याची मागणी करणार असल्याची माहिती स्थानिक नगरसेवक नाना काटे व नगरसेविका शितल काटे 'सकाळ' शी बोलताना दिली आहे. याबाबत लवकरच ते महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन याबाबतचे रितसर पत्र ते देणार आहेत. 

नवी सांगवी (पुणे) : पिंपळे सौदागर येथील नव्याने विकसित होत असलेले लिनिअर गार्डन रहाटणी पर्यंत वाढविण्याची मागणी करणार असल्याची माहिती स्थानिक नगरसेवक नाना काटे व नगरसेविका शितल काटे 'सकाळ' शी बोलताना दिली आहे. याबाबत लवकरच ते महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन याबाबतचे रितसर पत्र ते देणार आहेत. 

पिंपरी चिंचवड शहराच्या वैभवात भर घालणारे लिनियर गार्डनचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. आत्तापर्यंत दुसऱ्या टप्यापर्यंतचे काम पुर्ण होत आले असुन यंदाच्या वर्षात ते सामान्यांसाठी खुले होण्याची अपेक्षा येथील स्थानिक बाळगुण आहेत. पिंपळे सौदागरच्या स्वराज चौक ते कोकणे चौकापर्यंतच्या दोन किमी लांबीचे हे उद्यानाला महापालिकेचा महत्वाकांशी प्रकल्प म्हणून पाहिले जात आहे. परंतु हाच प्रकल्प पुढे रहाटणी येथील रॉयल पार्क, लिआँन आँरबिट पर्यंत नेण्याची मागणी या राष्ट्रवादीच्या पतीपत्नी नगरसेवकांनी केली आहे. 

महापालिकेने नुकतेच कोकणे चौक ते काळेवाडी फाट्यापर्यंत उच्चक्षमता द्रुतगती (एचसीएमटीआर) मार्गाचे काम सुरू केले. तीस मिटर रुंदीच्या या रस्त्यामुळे पिंपळे सौदागरवरील वाहतुकीचा ताण हलका होऊन वाहतुक कोंडी कमी होणार आहे. परंतु नाना व शितल काटे यांनी या रस्त्याच्या विकासाबरोबर लिनिअर गार्डनचीही मागणी केली आहे. 

प्रस्तावित एचसीएमटीआर 30 मिटर रस्ता व सध्याचा सुरू असलेला 12 मिटर डीपी रस्ता अशा एकून 42 मिटर रूंदी होते. त्यात 24 मिटर हा एचसीएमटीआर रस्ता करून उर्वरित 18 मिटर मध्ये लिनिअर गार्डन झाल्यास स्थानिकांची उद्यान आणि सुरक्षित वाहतुक या दोन्ही बाजु पुर्ण होत असल्याचे नगरसेवक नाना व शितल काटे यांनी निदर्शनास आणून दिले आहे. 

नगरसेवक नाना काटे म्हणाले, "सध्याचे नियोजित लिनियर गार्डन पार्क राँयल पर्यंत होणार होते याबाबत तत्कालिन आयुक्त राजीव जाधव यांनी पहाणी देखील केली होती. त्यामुळे सध्याचा उच्चक्षमता द्रुतगती मार्ग चोविस मिटरचा करून उर्वरीत अठरा मिटरमध्ये लिनियर गार्डन करून पर्यावरण पूरक असा सुवर्ण मध्य साधावा व लोक भावनेचा आदर करावा."  

Web Title: demand for linear garden extend to rahatani