बाणेर येथील उद्यान आरक्षण कायम ठेवण्याची मागणी

बाबा तारे
मंगळवार, 10 जुलै 2018

पुणे (औंध) : बाणेर येथील सर्वे क्रमांक 35/1/2 येथील  उद्यानाचे आरक्षण उठवण्याच्या हालचाली झाल्यानंतर सर्व स्तरातून यास कडाडून विरोध करत आरक्षण कायम ठेवण्याची मागणी केली जात आहे. प्रभाग क्रमांक 9 च्या स्थानिक नगरसेविका ज्योती कळमकर यांनीही यासंदर्भात आपला विरोध दर्शवत पुणे विभागाचे नगररचना सहसंचालक यांना निवेदन देऊन उद्यानाचे आरक्षण कायम ठेवण्याची मागणी केली आहे.

बाणेर बालेवाडी परिसराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता या ठिकाणी उद्यान असणे आवश्यक असल्याचे निवेदनात कळमकर यांनी नमूद केले आले आहे. स्थानिक नागरीकांचा आरक्षण उठवण्यास असलेला विरोध लक्षात घेता हे आरक्षण कायम ठेवावे व बाणेर बालेवाडीकरांना किमान एक तरी उद्यान उपलब्ध व्हावे असेही कळमकर यांनी सांगितले.

Web Title: Demand for maintaining garden reservation at Baner