पुणे - खैरेवाडी येथे पूल उभारण्याची मनसेची मागणी

बाबा तारे
शनिवार, 12 मे 2018

औंध (पुणे) : गणेशखिंड रस्ता परिसर व पुढील उपनगरांमध्ये होत असलेली वाढ यामुळे या रस्त्यावरील खैरेवाडी चौकात नियमीत वाहतूक कोंडी होत आहे.

अत्यंत वर्दळीचा रस्ता असल्याने याठिकाणी रस्ता ओलांडतांना अपघात होऊ शकतात हे अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी लोखंडी पादचारी पूल तयार करावा अशी मागणी मनसेचे शिवाजीनगर उपाध्यक्ष सुहास निम्हण यांनी मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

गणेश खिंड रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट लोकवस्त्या आहेत त्यामुळे या ठिकाणी पायी रस्ता ओलांडणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. तसेच या रस्त्यानेच औंध, बाणेर, पाषाण, पिंपरी-चिंचवडमार्गे पुणे-मुंबई महामार्गाकडे जाण्याचा मार्ग असल्याने गाड्यांची नेहमीच वर्दळ असते. या भागात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शाळा, महाविद्यालय, चतुःशृंगी देवीचे मंदिर, थिएटर, शॉपिंग मॉल, मोठे हॉटेल, कार्यालये याच रस्त्यावर आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या वाहनांची व पादचाऱ्यांची संख्या जास्त असते.  

या ठिकाणी तीव्र उतार असल्याने वाहने अत्यंत वेगाने येतात व नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. त्यामुळे येथे अनेक वेळा छोटे मोठे अपघातही झाले आहेत. यापुर्वी प्रशासनाने सिग्नल व वाहतूक पोलिसांची नियुक्ती करुन बऱ्याच प्रमाणात सहकार्य केले आहे. परंतु एका मॉलच्या  आराखड्याला परवानगी देतांना नागरिकांना रस्ता ओलांडतांना सुरक्षेसंदर्भात काळजी घेतली गेली नाही.

काही ठिकाणी लोखंडी पुलाची गरज नसतांना उभारले गेले आहेत परंतु खैरेवाडी येथे खरी गरज असतांना आजपर्यंत पूल उभारला नाही. सकाळी ९ ते ११ व सायंकाळी ५ ते ८ या वेळेत विद्यार्थी, जेष्ठ नागरिक यांचे रस्ता ओलांडतांना  हाल  होतात यामुळे परिसरातील नागरिक वैतागले आहेत.तरी एखादा मोठा अपघात होण्याची वाट न पाहता या ठिकाणी लोखंडी पादचारी पूल तयार करावा अशी मागणीही निवेदात करण्यात आली आहे. महिन्याभरात लोखंडी पादचारी पूल तयार करण्यासंदर्भात हालचाल झाली नाही तर मनसे पध्दतीने आंदोलन केले जाईल व होणाऱ्या अपघातास प्रशासनास जबाबदार धरले जाईल.तसेच मनपा प्रशासनाकडे पूल तयार करण्यास निधी नसेल तर तसे लेखी स्वरूपात द्यावे लोकवर्गणीतून हा पूल उभारण्यात येईल असेही  महापालिका आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Web Title: demand of mns for bridge on khairewadi aundh pune