जुनी सांगवीतील उघड्या चेंबरला झाकणे बसवा-मनसेची मागणी

रमेश मोरे
सोमवार, 2 जुलै 2018

गेली पंधरा दिवसापासुन जुनी सांगवी अंतर्गत जवळपास सतरा ते अठरा चेंबर झाकणाविना उघडे आहेत.

जुनी सांगवी - जुनी सांगवी अंतर्गत रस्त्यावरील चेंबरवर झाकणे नसल्याने गेली पंधरा दिवसापासुन परिसरातील चेंबर धोकादायरित्या उघडे आहेत. येथील प्रियदर्शनी नगर, ममतानगर, पी. डब्ल्यु. डी. कॉलनी, कुंभारवाडा, वेताळ महाराज उद्यान रस्ता आदी ठिकाणचे चेंबर झाकणाविना उघडे आहेत. रात्री रहदारी करताना हे चेंबर नजरेस येत नसल्याने उघडे चेंबर अपघाताला कारणीभुत ठरत आहेत. याबाबत तात्काळ येथील उघड्या चेंबरला झाकणे बसविण्यात यावी अशी मागणी मनसेचे राजु सावळे यांनी निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता ह प्रभाग यांच्याकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, गेली पंधरा दिवसापासुन जुनी सांगवी अंतर्गत जवळपास सतरा ते अठरा चेंबर झाकणाविना उघडे आहेत. उघडे चेंबर रहदारीसाठी धोकादायक ठरत आहेत. यामुळे किरकोळ अपघातही परिसरात घडले आहेत. या सर्व ठिकाणच्या चेंबरला झाकणे ताबडतोब बसविण्यात न आल्यास संबंधित अधिकाऱ्यांना चेंबरमधे उभे करून मनसे स्टाईल आंदोलनाचा ईशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

आम्ही कामाला सुरूवात केली आहे. चेंबरवरील लोखंडी झाकणे गायब झाली आहेत. याबाबत आरोग्य विभागाला कळवले आहे.लोखंडी झाकणाऐवेजी सिमेंटची झाकणे बसविण्यात येत आहेत. - श्री. सचिन सानप, कनिष्ठ अभियंता ह प्रभाग स्थापत्य विभाग.

गेली पंधरा दिवसापासुन येथील बऱ्याच ठिकाणचे चेंबर उघडे आहेत. संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. - श्री.राजु सावळे-मनसे

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The demand for MNS was to cover the open chamber at old Sangvi