दहीहंडी वर्गणीच्या नावाखाली खंडणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

पुणे : दहीहंडीच्या नावाखाली बेकायदा वर्गणी मागण्याबरोबरच वर्गणी न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका आरोपीस हडपसर पोलिसांनी अटक केली. तर, त्याच्या दोन साथीदारांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. त्यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार हडपसर येथे घडला. विशाल अप्पा मिरेकर (रा. गाडीतळ, हडपसर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी हडपसरमधील व्यापाऱ्यांनी फिर्याद दिली आहे. 

हडपसर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील तांबे हे हडपसर परिसरातील व्यापाऱ्यांशी त्यांच्या समस्यांबाबत संवाद साधत होते. त्या वेळी त्यांना विशाल मिरेकर व त्याचे दोन साथीदार हे व्यापाऱ्यांना दहीहंडीसाठी दोन हजार रुपयांची वर्गणी मागत आहेत आणि वर्गणी न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देत असल्याचे समजले. मिरेकर व त्याच्या साथीदारांकडून दुकानाची तोडफोड करण्याबरोबरच मारहाण होईल, या भीतीने व्यापाऱ्यांनी हा प्रकार पोलिसांना सांगितला नाही. मात्र, तांबे यांनी स्वतः व्यापाऱ्यांकडे येऊन संवाद साधल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, सार्वजनिक उत्सवाच्या नावाखाली जबरदस्तीने वर्गणी मागून व्यापाऱ्यांना त्रास देणाऱ्यांविरुद्ध तक्रार देण्यासाठी व्यापाऱ्यांनी पुढे यावे, त्यांच्या तक्रारीनुसार तत्काळ कारवाई करण्याचे आश्‍वासन तांबे यांनी दिले. 

Web Title: demand for Money for Dahihandi festival