सांगवी परिसरात मच्छरदाणीला मागणी वाढली

रमेश मोरे
मंगळवार, 10 एप्रिल 2018

जुनी सांगवी - उन्हाचा वाढलेला पारा व मुळा नदीपात्रातील जलपर्णीमुळे वाढलेल्या डासांनी सांगवीकर पुरता हैराण झाले आहेत. सायंकाळी सहा पासुन सुरू होणा-या डासांच्या त्रासामुळे सांगवीकरांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. कासावीस करणारा उकाडा आणी डासांमुळे सांगवी परिसरात मच्छरदाणीला मागणी वाढली आहे. विक्रेत्या फेरिवाल्यांनी येथील गरज ओळखुन सांगवी परिसरात मच्छरदाणीची विक्री करण्यात सुरुवात केली आहे. 

डासांच्या चावण्यामुळे अंगावर लाल पुरळ उठण्याचे प्रकार घडु लागले आहेत. तापमान वाढीबरोबरच याचबरोबर घसा खवखवणे, डोकेदुखी असे आजार सांगवी परिसरात बळावले आहेत. धुप, मच्छर अगरबत्तीच्या धुरांमुळे अनेकांना खोकला, धाप लागण्याच्या तक्रारीत भर पडली आहे. धुर आणी डासांपासुन स्वरक्षणासाठी मच्छरदाणी खरेदीकडे सर्वसामान्य नागरीकांचा कल वाढला आहे. डासांचा प्रादुर्भाव कधी कमी होणार याची वाट नागरिक बघत आहेत. 

Web Title: Demand for mosquito net in Sangvi area