शैक्षणिक शुल्काबाबत राष्ट्रवादीकडून करण्यात आली 'ही' महत्त्वाची मागणी

ncp1.jpg
ncp1.jpg

मयूर काॅलनी (पुणे) : सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने जगासमोर महामारीचे संकट उभे आहे, याचा परिणाम जगामध्ये सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शिक्षण इ सर्व क्षेत्रावर झाला आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये अद्याप परीक्षा घ्याव्या किंवा नाही, शाळा / महाविद्यालये सुरु कराव्या अथवा नाही तसेच जिथे शाळा सुरू करणे शक्य नसेल तिथे ऑनलाइन किंवा रेडीओ /टिव्ही या माध्यमाद्वारे नियमावलीच्या आधारे नवीन शैक्षणिक वर्षाची आखणी करण्याचे सूचित केले असले तरीही अद्याप त्याला अंतिम स्वरूप प्राप्त झालेले नाही.

शैक्षणिक वर्ष कधी सुरू करावे या बाबतचा आदेशही नाही.
असे असताना देखील काही शैक्षणिक संस्थांनी सन २०२० - २१ या वर्षाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू करून प्रेवश निश्चित करण्यासाठी शुल्क, पुस्तक विक्री, गणवेश तसेच अन्य शुल्क भरण्याविषयी पालकांना सूचित केल्याने पालकांकडून राष्ट्रवादी युवक काँग्रेससकडे तक्रारी आल्या असल्याने या तक्रारीचा विचार करून राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहरचे सरचिटणीस गिरीश गुरूनानी यांनी संबंधित संस्थेला पत्राद्वारे कोरोनाच्या संकटात फी सक्ती करु नये अशी मागणी केली आहे. तसेच पत्रात म्हटले आहे की, वास्तविक पाहता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अपरिहार्य लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला खीळ बसल्याने अनेक कुटुंबावर आर्थिक संकट घोंगावत आहे. त्यामुळे बरेच पालक शैक्षणिक शुल्क भरण्यास असमर्थ आहेत. 

तरी अशा संस्थांनी सध्याच्या परिस्थितीचा सामंजस भूमिकेतून विचार करून शिक्षण / अन्य शुल्क त्वरित भरण्याची अट न घालता प्रेवश प्रक्रिया नियमाप्रमाणे करावी व प्रत्यक्ष ज्यावेळी शाळा / महाविद्यालये सुरू होतील. त्यावेळी शैक्षणिक शुल्क भरण्यास मुभा द्यावी शैक्षणिक शुल्का संबंधी आताच सक्ती करू नये असे पत्र भारतीय विद्या भवनची, परांजपे शाळा कोथरूड यांना देण्यात आले आहे.
    

"पालकांनी मासिक हप्ता दिला तरी चालेल,फी संदर्भात कोणावरही सक्ती करण्यात आली नाही. दरवर्षी देतो तसे विनंती पत्र पालकांना पाठवले आहे. पालकांना सवलती देण्यात आल्या आहेत. ज्या पालकांना फि भरण्यासाठी अडचण आहे. त्यांना मुदत दिली आहे".
- नंदकुमार कार्किर्डे, मानद सचिव, भारतीय विद्या भवन शाळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com